डाळीच्या पीठाचा ढोकळा
🔹साहित्य
•१वाटी डाळीचे पीठ
•१वाटी कोमट पाणी
•१ डाव आंबट ताक
•मीठ,
•आले
•मिरची
•धणे
•साखर
•खायचा सोडा
🔹कृती:
●आदल्या दिवशी रात्री डाळीचे पीठ व पाव वाटी ताक एकत्र करुन पीठ भिजवून झाकून ठेवावे.
●दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात मीठ, मिरची व आले बारीक वाटून घालावे
●चार मेथीचे दाणे चिमूटभर धणे चवीसठी साखर अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा साखर घालावी.
●१चमचा तेलाचे मोहन घालून पीठ कालवावे.
●स्टीलच्या डब्यात तेलाचा हात लावून फिरवून त्यात हे मिश्रण भरावे
●कुकरला अर्धा तास वाफवून काढावे.
●गार झाल्यावर वड्या कापून वरुन फोडणी द्यावी.
रुचिरा जोशी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा