शेवयांची खीर
💠साहित्य
१. दुध १/२ लीटर
२. मँगो फ्लेवर शेवया १ वाटी
३. मारी बिस्कीट ५ ते ६
४. कस्टर्ड पावडर १/४ छोटा चमचा
५. वेलचीपूड १/४ चमचा
६. साखर १ वाटी
७. पाणी १ ग्लास
८. सजावटीसाठी ड्रायफ्रूटस्
💠कृती
◆ प्रथम साखर घालून दुध उकळी काढून घ्यावे.
◆ मिक्सरमधून बिस्कीटांची पूड करून घ्यावी. आणि बाजूला एका वाटीत पाणी घालून पेस्ट करून घ्यावी.
◆ शेवया तुपावर परतून घ्याव्या.
◆ आत्ता उकळत्या दूधात बिस्कीट पेस्ट घालून एक उकळी आणावी. नंतर शेवया घालून खीर चांगली शिजवून घ्यावी.
◆ नंतर वेलचीपूड घालावी.
◆ कस्टर्ड पावडर पाण्यात विरघळून उकळत्या खिरीत ओतून उकळी आणून गॅस बंद करावा.
◆ तयार शेवया खिरीवर ड्रायफ्रूट घालून आनंदाने खावयास द्यावी.
सौ. वैशाली वेटाळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा