Friday, August 18, 2017

कर्टुले चा ठेचा

साहित्य:  कर्टुले,तेल, हिरवी मिर्ची, जिरे किंवा लसूण,तीळ किंवा शेंगदाणे चा कूट,चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आणि हिंग

कृती: 

 १. प्रथम कर्टुले स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यावे, आणि चिरून घ्यावेत.(कार्टुल्यातील बी जाडसर असेल तर काढून टाकावे)

२. मिर्ची चे देठ काढून दोन तुकडे करून घ्यावेत.

३. लोखंडी कढईत चमचभर तेल घेऊन त्यात कार्टुले, मिर्ची आणि चालत असेल त्यानी लसूण पाकळी घालून मंद आचेवर झाकण झाकून वाफवून घ्यावे.

४. किंचित लालसर झाल्यावर गॅस बंद करून मिर्ची कार्टुले गार होई पर्यंत तसेच झाकण झाकून ठेऊन द्यावे.

५. गार झालेल्या मिश्रणात तिळाचा किंवा शेंगदाण्याचा कूट, मीठ, जिरे(लसूण घेतले तर जिरे नको)घालून लोखंडी खलबत्त्यात कुटून घ्यावे.

६. तयार ठेच्याला मोहरी,जिरे,हिंग,किंचित हळद याची झणझणीत फोडणी घालावी.
(जिथे लसूण वापरतो तिथे हिंग वापरू नये. ठेच्यात लसूण घातला तरी फोडणीला जिरे वापरावेत)

नोट: पुणेरी लोकांसाठी खास ज्यांना गूळमट चव आवडते त्यानी किंचित गुळाचा खडा वापरावा. लोखंडी कढई आणि लोखंडी खलबत्त्या च्या वापराने लोहयुक्त ठेच्याचा आनंद घेता येईल.

भार्गवी दीक्षित

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा






No comments:

Post a Comment