साहित्य: १ वाटी भगर, १/२ वाटी साखर,२चमचे तूप,२ लवंगा,१ विलायची,५ काड्या केशर किंवा केशरी रंग,सुकामेवा, १/२वाटी नारळाचा किस(चव)
कृती: प्रथम एक वाटी भगर स्वच्छ निवडून धुवून घ्यावी.
एक जाड बुडाच्या भांड्यात १चमचा तूप घेऊन जरा गरम झाले की त्यात ड्रायफ्रूट लवंग विलायची घालून परतून घ्यावे आणि त्यात दीड वाटी पाणी घालावे.
पाणी उकळत आहे की त्यात धुतलेली भगर घालावी,आणि झाकण झाकून ठेऊन द्यावी.
मंद आचेवर ५-७मिनिटात भगर पूर्ण शिजल्यावर भांड्याचे झाकण न काढता गॅस बंद करावा.
दुसऱ्या पातेल्यात १/२वाटी साखर आणि त्यात साखर बुडेपर्यंत पाणी घेऊन मंद गॅस वर पाक करण्यासाठी ठेऊन द्यावे. मिश्रण चमच्याने सतत ढवळत राहावे. दोनतारी पाक झाला की त्यात ओल्या नारळाचा किस(चव) मिसळून घ्यावा.
तयार पाकात केशर किंवा केशरी रंग टाकून पाक ढवळून घ्यावा.
तयार पाक भागरीच्या तयार भातात टाकून हलक्या हाताने मिश्रण मिसळून घ्यावे.
भगरीचे गोळे होणार नाहीत यांची काळजी घ्यावी आणि पाक सगळीकडे सारखा मिसळून झाला की मंद आचेवर झाकण झाकून एक सणसणीत वाफ द्यावी.
भार्गवी दीक्षित

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
मस्त!
ReplyDelete