Saturday, May 12, 2018

विविध पराठे

🔷बीट कोबी पराठे🔷

साहित्य

२ बीट, कोबीचा वाटीभर कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ च जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ व तिखट, तेल, कणीक ३ वाट्या

कृती -

प्रथम बीटची साल काढून तो कच्चाच किसून घ्यावा, कोबी किसून घ्यावा.
२ चमचे तेलावर प्रथम बीट जरा परतून घ्यावा, पाणी न घालता आणि झाकणही न ठेवता. नंतर त्यात कोबी कीस घालावा. तोही असाच परतावा. किंचित मऊ झाल्यावर तिखट , जिरेपूड व कोथिंबीर घालावी. व मिश्रण गॅसवरून उतरवावे.
मिश्रण गार झाल्यावर मीठ घालावे म्हणजे पाणी सुटणार नाही.
त्यानंतर पोळीसारखी मळून ठेवलेली कणीक घ्यावी. दोन मध्यम आकाराच्या पोळ्या लाटून त्यापैकी एका पोळीवर हे सारण पसरवावे व त्यावर दुसरी पोळी ठेवून दाबावे व कडा चिकटवून पुन्हा वरून किंचित लाटावे.
हा पराठा तव्यावर भाजावा. भाजताना आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालावे.
उतरल्यावर सुरीने कापून अर्धे भाग करून ठेवावे.
यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली ढोबळी मिरची, कांदा ही घालू शकतो.

- वैशाली कार्लेकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कोबी पराठा  

कोबी किसावा कींवा बारीक चिरावा .तेलात मोहरी ,बारीक चिरून कडिपत्ता ,मिर्ची आल वाटण हिंग ,हळद घालून कोबी परतावा ,येक वाफ काढावीं .परतुन कोरडा करावा .कोथिम्बिर ,लीम्बुरस घालून .पराठा लाटावा.

वैशाली मोजरकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कच्च्या कोबीचे पराठे

कच्च्या कोबीचे पण पराठे छान होतात कोबी किसून त्यात आलंमिरची वाटून घालावे कणिक डाळीचे पाणी ठ आणि तांदुळाचे पीठ तिखट मीठ कोथिंबीर घालून चांगले मळून पराठे करावेत

डॉ.अर्चना चव्हाण
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷बटाट्याचे पराठे

३ मोठे बटाटे वाफवून घेतले , १ बीट , १ गाजर , कोथिंबीर , कसुरी मेथी , गरम मसाला धणे जिरे पूड , २ चमचे दहि आणि मीठ
सगळे जिन्नस एकत्र करून त्या मध्य कणिक जेवढी मावेल तेवढी टाकून मळून घेणे  आणि पराठे लाटून दोन्ही बाजूने तूपात भाजून घेणे

अश्विनी चिकणे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷काॅर्न पराठा

साहित्य—

स्वीट काॅर्न एक वाटी, चार हिरव्या मिरच्या,  आल्याचा छोटा तुकडा, चार लसूणपाकळ्या,मीठ,कोथिंबीर, कसुरी मेथी एक चमचा,हळद

कृती

मीठ व कसुरी मेथी  सोडून सर्व जिन्नस मिक्सरवर वाटून घ्यावेत. परातीत मिश्रण काढून घेऊन त्यात मावेल तितकी कणीक दोन चमचे तांदळाचे  पीठ, चवीनुसार मीठ व कसुरी मेथी घालून गोळा  मळून घ्यावा. . पराठा लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा.

मंगला डोंगरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷मेथीचे पराठे

कणीक, मेथीची पाने,कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरुन, जीरे,मीठ, व तेल घालून पीठ मळून पराठे तव्यावर तेल घालून परतावे, खाली उतरवल्या नंतर तूप घालावे, पुदिना चटणी बरोबर खावे

पुदिना चटणी

पुदिना जास्त, थोडी कोथिंबीर, कांदा, मिरची, चिंच, गुळ आणि मीठ एकत्र मिक्सर मधे वाटावे

रीमा
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷एक अतिशय पौष्टिक रुचकर पराठा

काबुली चणे...छोले करतो ते
आदल्या दिवशी च भिजत घालावे.
सकाळी कुकरमध्ये खूप.
५-६ शीट्या काढून छान उकडून घ्यावेत.
आलं.लसूण मिरची कोथिंबीर घालून मिक्स र मधून,/फुड प्रोसेसर मधून बारीक करावे
Either हे स्टफींग घालून पराठे करावे
Or ह्यातच कणिक मळून जाडसर लाटून भाजून घ्यावे.

अंजली जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷अंडा पराठा

साहित्य

कणिक, मैदा,अंडी, कांदा, कोथिंबीर, मिरची,मीठ, दूध,तेल

कृती

थोडी जास्त कणिक आणि मैद्यात मीठ न तेल घालून पीठ भिजवून घ्यावे.
* कोथिंबीर, मिरची, कांदा, मीठ यांचं मिक्सर मधे वाटण बनवून घ्याव.
* तवा तापायला ठेवावा.
* अंडी फोडून त्यात वरील वाटण चांगल मिक्स करून घ्यावे.
* मध्यम आकाराचा उंडा घेउन त्याची पोळी लाटून घ्यावी.
* पोळी तव्यावर एका साईडने चांगली भाजून घ्यावी.पोळी उलटून भाजलेल्या साइडला चमच्याने तेल लावून घ्यावे.
* अंङ्याच्या मिश्रणात १ चमचा दूध घालावे न हे मिश्रण पोळीवर व्यवस्थित पसरून द्यावे.
* १ मिनिटाने पोळी उलटावी.
* अंड छान फुलून पराठा वर येतो
* वरच्या बाजूला मस्त बटर लावून खरपूस भाजून घ्यावे.
* Tomato sauce न कांदा कोथिंबीर salad सोबत सर्व्ह करावे.

Yummy.. yummy

जयश्री खराडे.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷अंड्याचा पराठा

कणीक, तिखट, तेल, मीठ, हळद, अंडी , काळीमिरी पावडर,
पिठात हळद, तिखट, मिठ व थोड तेल घालून मळून घ्यावे. अर्धा तास झाकून ठेवणे, अंडी फोडून फेटून घेणे, त्यामध्ये तिखट, हळद,मीठ,काळीमिरी पावडर,कोथिंबीर बारीक चिरून घालावी,  पिठाची गोळी घेऊन लांबट लाटून घ्यावी, त्या वर ते ल लाऊन घ्यावे बरोबर मधे चिमटीत पकडून लाटलेली पोळी गोळा करावी म्हणजे दोन होतील ते एकमेकावर दाबून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी, गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाजल्यावर मस्त फुगेल, गँस बारीक करुन पोळी हळूच उघडून त्या पाँकेट मधे अंड्याचे मिश्रण ओतून परत पोळी तेल सोडुन खरपूस भाजून घ्यावे. क्रिस्पी गरम गरम खायला पराठा मस्त लागतो.

जास्त पुदिना, थोडी कोथिंबीर, मिरची, आल, सैधव मिठ
ह्याची चटणी वाटुन घ्यावी, त्यामध्ये कणीक, ज्वारी, बाजरी पिठ, थोड राजगिरा पिठ, दही घालून घट्ट मळून घेऊन लाटून पराठे तुप लावून भाजावेत.

वंदना मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment