Saturday, May 12, 2018

डाळीचे धिरडे

डाळीचे धिरडे

साहित्य

२वाट्या बेसन,
१ चहाचा चमचा मिरची पावडर,
१ कांदा बारिक चिरुन,
१ हि मिरची बारिक चिरुन,
चिमूटभर हळद हिंग,
अर्धा चहाचा चमचा जीरे पावडर,
मीठ चवीनुसार,
१चमचा तेलाचे मोहन,
कोथिंबीर बारिक चिरलेली

कृती

वरील सर्व साहित्य एकत्र करुन त्यात पाणी घालून ईडलीपीठापेक्षा थोडे पातळ करावे, 1 चहाचा चमचा तेल तापलेल्या तव्यावर घालून त्यावर डावाने हे पीठ आतून बाहेर असे गोलाकार घालत जावे, झाकण ठेवून एक वाफ काढावी, उलथण्याने उलटून दुसरी बाजूही खमंग शेकावी, गरमागरम खाण्यास द्यावे.  सोबत कोणतीही चटणी, साॅस अथवा दही छानच लागते.

दीपाली बोधे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment