Saturday, May 12, 2018

पालेभाज्या

शेंपू भोपाळा

शेंपू व भोपला ची पाने घ्यावित
बारीक चिरून घ्यावी
तांदूळ कणी व तुर डाळ घ्यावी
कणी व डाळ शिजत ठेवावी
मग त्यात भाजी  ओली मिरची लसुन घालून शिजवावी पातळ ठेवावी वरुन फोडणी द्यावी मीठ घालावे छान लागते

ममता संसारे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

अंबाडी

साहित्य

निवडून घेतलेली अंबाडीची भाजी  ,तुरीची डाळ व कण्या तांदळाच्या शिजवून घेतलेल्या , लसूण पाकळ्या  लाल तिखट ,मीठ ,फोडणीला मोहरी , हिंग गूळ

कृती

कूकरला डाळ तांदूळ व वेगळी चिरलेली भाजी ऊकडून  घ्यावी . पाणी काढावे आमटीला वापरावे .फोडणीला लसूण घालून भाजी व शिजलेले डाळ तांदूळ टाकावे .मीठ तिखट टाकून  १वाफ द्यावी गूळ घालावा .शेवटी पानात घेताना कच्चं तेल घ्यावं गोडेतेलच  वा तीळाचं चव  छान लागते .
या बरोबर ज्वारीची भाकरीच हवी .शिळी अंबाडीची भाजी व भाकरी फारच छान लागते. खराबही होत नाही .

वृंदा कार्येकर 
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

पालक  व शेपू  आणि   आंबट चुका

कृती

फोडणी त  फक्त लसूण  बारीक  चि रून  आणि   हिरव्या मिरच्या , मीठ इ.भाजी ला   फोडणी   दि ल्यावर   हरभरा डाळीचे   पिठ  एक  चमचा   लावावे  ..चांगले    भाजीला  गरगटावे    चांगली    उकळी   येऊ  द्या ..एकदम   सिम्पल  ,,  आंबट   चुक्यामुळे  चवीला   छान   लागते ..

सुनंदा शिंदे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

पोकळा

ही भाजी बोटाएवढ्या आकाराची तोडून घ्यायची धुवून कोरडी करून घेणे नंतर मीठ घालून थोडा वेळ आचेवर ठेवावे. पाणी सुटते .एकदा दोनदा हलवून सर्व भाजी अर्धवट शिजली की गॅस बंद करावा. थोडा वेळ गेला की भाजी भाड्यात एका बाजूला ओढुन हलकेच उलतानीने दाबून भाजीतून सर्व पाणी काढून घेणे.
लोखंडी तव्यावर लसणच्या पाकळ्या किसलेली पेस्ट (भाजीच्या आणि आवडीच्या प्रमाणात)घालून नीट परतून घ्यावे त्यात पाणी दाबून काढलेली  भाजी घालावी. गॅस बंद करावा.

टिप-परत गरम करू नये अन्यथा पाणी सुटते

सविता काइंगडे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

पोकळ  ,तांदूळ , चवळई  ,पालक  ह्या   भाज्या   नेहमी च्या  भाज्यांसारख्याच  करतात   फक्त   चंदनबटवा  निवडून   धूवून  बारीक   चिरुन  वाफवून   घेणे   त्या त  थोडी   मुग डाळ   भाजी  उकडताना  टाकायची किंवा डाळीचे  पिठ  किंवा   ज्वारी चे   पिठ .लावावे   ..फोडणी    देताना   लसूण वाटून  जिरे  ,हिरव्या   मिरच्या   वाटून   किंवा   बारीक   चिरुन   घालाव्यात  .....भाजी  शिजवून घेतलेली   त्या  फोडणी त  घालून   चांगली   गरगटावी..ज्वारी च्या   भाकरी   बरोबर   चांगली  लागते ...

२)पोकळा  --निवडून    धूवून  चिरुन   एका  वाफेत  शिजवून   घ्यावा  .. हलक्या  हाताने  पिळून   घ्यावा ..लसूण बारीक चिरुन  व कांदा  बारीक   चिरून  आणि   हिरव्या   मिरच्या   बारीक   चिरून   सर्व   साहित्य   घालून  त्या त  मुगाची  डाळ   भाजीची  तयारी   करत  असताना   डाळ   भिजत   घालावी ..त्या त  सर्व   परतावे   नंतर   भाजी  घालून  हलकेच  परतावे

सुनंदा शिंदे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

पोकळा

साहित्य

पोकळा
कांदा
टोमॅटो
मिरची
लसूण
मीठ
जिरे मोहरी
हिंग
तेल
हळद

कृती

पाहिले पोकळा निवडून घेऊन बारीक चिरून घ्यावा. नंतर कढईत तेल घालून त्यात जिरेमोहरी घालुन त्यात हिंग घालून मग लसूण, मिरची, कांदा, टोमॅटो हे घालून छान फ्राय झाले की हळद घालून त्यात पोकळा आणि मीठ घालून छान शिजू द्यावी

अभिलाषा अमोल शिंपी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

मायाळूचे सांबार (कारवारी पद्धतिचे)

साहित्य:

एक जुडी मायाळू, अर्धी वाटी तुरडाळ, दोन मध्यम कांदे (बारीक चिरुन), चार लसूण पाकळ्या (बारीक चिरून), अर्धी वाटी ओले खोबरे (कातलेले), ४-५ सुक्या बेडगी मिरच्या, अर्धा चमचा हळद, ३-४ कोकम सोले/ आमसुले, एक चमचा सांबार मसाला, ३ ते ४ चमचे खोबरेल किंवा कोणतेही तेल, मीठ चवीनुसार, दोन-तीन वाट्या गरम पाणी 

कृती:

मायाळूची पाने व कोवळे देठ निवडून, स्वच्छ धुऊन बारीक चिरुन घ्यावेत. तुरडाळ धुऊन स्वच्छ पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावी. भिजलेली डाळ व चिरलेली मायाळू एका भांड्यात एकत्र करून प्रेशर कुकरमध्ये दोन ते तीन शिट्या होतील इतपत शिजवून घ्यावी. दुसऱ्या पातेल्यात एक चमचा तेल गरम करून त्यात सुक्या मिरच्या भाजून घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, कातलेले खोबरे व हळद पूड एकत्र करुन मिक्सरवर गंधासारखे बारीक वाटण वाटून घ्यावे. त्याच पातेल्यात आणखी दोन चमचे तेल घालून ते गरम होताच त्यात कांदा व लसूण घालून मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परतावे. आता त्यात शिजलेले डाळ- मायाळूचे मिश्रण त्यातील पाण्यासह घालावे. लगेच कोकम सोले/ आमसुले धुऊन त्यात घालावीत. त्यात मीठ घालावे. मध्यम आचेवर चांगली रसरशीत उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर आधी करुन ठेवलेले वाटण घालावे. एकजीव होईल इतपत ढवळून घ्यावे. वाटण घातल्यावर नारळाचा रस फाटू नये म्हणून आच मंद करावी. आता त्यात सांबार मसाला घालून ढवळून घ्यावे. मंद आचेवर पाच मिनिटे सांबार मुरत ठेवावे. पाणी आटले असेल तर पातळ भाजी होईल इतपत थोडे थोडे गरम पाणी अंदाजे घालावे व ढवळून घ्यावे. सर्व एकजीव झाले की झाले सांबार. तयार गरमागरम सांबार भातावर किंवा पोळीसोबत पण खायला छान.

-सौ. प्रीति कामत-तेलंग
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

करडई ची भाजी

साहित्य :

करडईची एक जुडी, लसुण पाकळ्या ६,७ , भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या , मीठ

कृती :

करडईची पान देठापासुन वेगळी करुन घ्यावी स्वच्छ धुवुन पाणी निथळुन घ्यावी . मोठ्या आकारात कापुन थोड पाणी घालुन वाफवुन घ्यावी . नंतर बाऊल मध्ये काढुन थंड करावी .तोपर्यंत मिक्सरला शेंगदाणे + हिरवी मिरची (चवीनुसार तिखट घ्या) पाणी घालुन  वाटुन घ्या .कढईत तेल गरम करुन त्यात लसुन सोलुन थोडासा चेचुन( ठेसुन )घालावा . त्यात भाजी घालावी थोड परतुन त्यात वाटलेले शेंगदाणे घालावे .घट्टसर रस्सा करुन शिजवुन घ्या .बाजरीच्या भाकरी सोबत छान लागते याच पद्धतीने हरभर्याच्या पाल्याची  , शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करता येते त्यात फक्त पाला शिजवुन घ्यायची गरज नाही .

सागर महाजन
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

  अंबाड्याची भाजी

साहित्य :-

अंबाड्याची भाजी१पेंढी,हरभरा डाळ मूठभर, तांदूळ मूठभर,शेंगादाणे मूठभर,हिरवी मिरची,लसूण मीठ,फोडणीचे साहित्य

कृती:-

सर्वप्रथम अंबाड्याची भाजी निवडून धुऊन घ्यावी.कुकरच्या भांड्यात अंबाड्याची भाजी ,हरभरा डाळ,तांदूळ व शेंगादाणे टाकून थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी.शिजल्यावर पाणी पूर्ण निथळून काढावे.नंतर रवीने वरील भाजी घोटून घ्यावी.मिरची वाटून घालावी व लसूण ठेचून घालावा,मीठ घालावे व मिसळावे.दुसऱ्या भांड्यात तेल घेऊन त्यात थोडे जीरे मोहरी किंचितशी हळद टाकून फोडणी करावी.यात अंबाड्याच्या भाजीचे तयार केलेले मिश्रण घालावे.लगेच गॅस बंद करावा.सर्व एकजीव करावे.
अंबाड्याची भाजी खाण्यासाठी तयार👍🏽👍🏽👍🏽

सौ.वैशाली पाटील
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

ममता संसारे-अंबाडीची भाजी साफ करुन चिरून घ्यावी तुरीची डाळ व तांदूळ कणी घ्यावी डाळ व कणी शिजवून घ्यावी चिरलेली भाजी पण उकडून घ्यावी पाणी काढून टाकावे तेलावर लसुन हींग ओली मिर्चिची फोडणी द्यावी मीठ घालावे खाताना कच्चे तेल घालून खावी

डॉ.वसंत काळपांडे  कोथिंबिरीच्या देठांचे सूप आणि सेलरीचे सूप यांच्या चवी अगदी एकसारख्या वाटतात.

वंदना मंकीकर- पाले भाजी चे देठ, मटार ची साल , फ्लॉवर चे देठ यांच सुप छान चविष्ट होत
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

चिंचेच्या पाल्याची चटणी

आंबट चिंचेचा तयार पाला याला लागतो

साहित्य :

तयार पाला , लाल मिरची पावडर , हळद ,तेल,  मीठ, कांदा ,आल लसुण पेस्ट , मोहरीचे दाणे , धणे पुड ,गुळ

कृती :

तेलात मोहरी तडतडवुन घ्यायची मग कांदा लालसर करुन घ्या . त्यात पेस्ट घालुन परतवा.गॅस कमी करुन हळद , मीठ , लाल तिखट घाला परतवुन यात चिंचेचा पाला घाला . गॅस बंद करायच्या १ मिनीट आधी किंचीतसा गुळ घालुन फक्त परतवा . आंबट , तिखट , गोड एकत्र अनुभव

सागर महाजन
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

चंदन बटवा भाजी

कातरे. असलेली टोमॅटो पानां सारखी दिसते पण लहान पानं
मधेच पानांच्या मागे खूप सुंदर गुलाबी रंग असतो.
ताकातला बटुआ..पानं काढून, धुवून , भिजवलेल्या डाळ दाण्यां सकट शिजवून घ्यावे.किंचित आंबट ताकात पाणी,बेसन, ठेचलेले आले घालावे.त्यात उकडलेली भाजी कुस्करुन घालून  चिमुटभर हळद घालून उकळी आणावी.चवीनुसार मीठ,साखर   घालावी . वरून तुप, जिरे हिंग, मिरची कढीपत्ता घालून केलेली फोडणी घालून छान उकळी आणावी.ताकात ली चंदन बटवा भाजी तयार

अंजली जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

अंबाडी ची भाजी

साहित्य

कच्चे शेंगदाणे
ज्वारी ची कणी
तादूंळ
तूर डाळ
हिरव्या मिरच्या ठेचा
लसणाच्या पाकळ्या
आलं
हिंग
जिरे

कृती

  प्रथम भाजी गरम पाण्यातून बाहेर काढून घेणे चिकट होते.
हाताने हलकेच दाबून पाणी काढून एका परातीत भाजी पसरवणे त्यावर  ज्वारीची कणी +तांदूळ+थोडावेळ भिजवलेली तूरडाळ +कच्चे शेंगदाणे अर्धवट फोडलेले किंवा डाळी  +ठेचा+हिंग +भाजलेल्या जीरे पूड  घालून एकजीव करून घ्यावे  .
  नंतर मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत व एका मोठ्या पातेल्यात मक्याच्या कणसाची वरील पाने एक सारखी पसरवणे .त्यात एक ग्लास पाणी घालावे
     त्या पानाचा किमान थर असावा. त्यावर एक जाळी ठेवावी जेणेकरून मोदक पात्र पाण्यात बुडणार नाही
वरील गोळे एका मोदक पात्रात सुती कापडात हे गोळे झाकून वाफवून घ्यावेत.
   नंतर कढईत तेल गरम करून आलं लसूण पेस्ट घालून जेवढी हवी आहे तेवढेच गोळे परतून घ्यावे. शेवटी मीठ घालून वाफ येऊ द्यावी
  नाहीतर फोडणी न करताही मीठ घालून खाता येते

सौ.सविता काईगडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment