🔷दही वडा (दही भल्ले)🔷
साहित्य
उडिद डाळ,त्याच्या निम्मी मूग डाळ,आलं,मिरची, ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे, कोथिंबीर, मीठ, जिरं,हिंग.उडी
गोड दही, लाल तिखट, भाजलेल्या जिरे पूड
कृती
उडीद डाळ न मूग डाळ वेगवेगळ्या ४-५ तासांसाठी भिजत घालाव्यात.
* पाण्यातून उपसून मिक्सर मधे आलं, मिरची, जिरे , ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे न मीठ यासह वाटून घ्याव्यात.
हे वाटण चमचा/हाताने चांगले फेटून घ्यावे.(वडे मस्त spongy होतात).
* तेल तापेपर्यंत थोड्याशा पाण्यात हिंग मिक्स करून घ्यावे.(यामुळे वडे पचायला हलके होतात... ही माझ्या एका पंजाबी मैत्रिणी ची टीप).
* आपल्याला हव्या त्या साईज चे वडे पहिल्यांदा मोठ्या आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
* हे वडे हिंगाच्या पाण्यात १५-२० मिनिटे बुडवून ठेवावेत.
हे वडे २ तळहातांमधे अलगद दाबून थोडे पिळून घ्यावेत.
* एका बाजूला थंड दह्यात आवडीप्रमाणे साखर,मीठ मिसळून चांगले घोटून घ्यावे.
* सर्व्ह करताना वडे त्यावर दही मग लाल तिखट, जिरे पूड न आवडीच्या गोड आणि हिरव्या चटणीबरोबर न किंचितशी कोथिंबीर पसरून द्यावे.
च ट प टि त दही वडा तयार.
(खजूर,चिंच गूळ गोड चटणी न हिरवी कोथिंबीर चटणी रेसिपी खाली टाकते.)
🔷चिंच-गूळ-खजूर गोड चटणी🔷
साहित्य
चिंच, गूळ, खजूर,लाल तिखट, जिरे पूड,आख्ख े धणे, पांढरे तीळ,corn flour, तेल,मीठ
कृती
चिंच आणि गूळ पाण्यात वेगवेगळे ५-६ तासांसाठी भिजत घालावेत.
* खजूर बिया काढून मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.
* गूळ आणि चिंच पाणी गाळून घ्यावे, चिंच पाण्यात कुस्करून पुन्हा एकदा पाणी गाळून घ्यावे.
*Gas वर थोड्याशा तेलात धणे आणि तीळ तडतडल्यावर गूळ चिंचेचे पाणी न खजूर पेस्ट फोडणीस घालावी.त्यात जिरे पूड, लाल तिखट न मीठ यासह एक उकळी आणावी.
*एका वाटीत पाणी आणि corn flour ची पातळ पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट वरील चटणीत मिक्स करून आणखी एक उकळी काढावी.
*थंड झाल्यावर आवडत्या वाडग्यात काढून घ्यावी.
जयश्री खराडे.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment