Saturday, May 12, 2018

पालक पेसरट्टू

🔷पालक पेसरट्टू🔷

भिजवलेले हिरवे मूग 1 वाटी
बारीक रवा 1 टेबल स्पून
हिरवी मिरची
आलं
कोथिंबीर
पालक प्युरे ( उकळत्या पाण्यात ब्लाँच करून घेतली) 1/2 वाटी
मीठ

कृती-:

रवा सोडून सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या, रवा घालून थोडा वेळ बाजूला ठेवा. रवा चांगला भिजून फुलला की नॉनस्टिक पॅनवर थोडसं तेल घालून पेसरट्टू घाला.

यात मी कधी कधी पनीर, गाजर, बीट बारीक किसून घालते.

अमृता बोकील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment