कैरीचे पन्हं
साहित्य
४ कैरी मध्यम आकाराच्या,
२ कप साखर किंवा गुळ
२ कप पाणी,
१ टीस्पून काळमीठ,
१/२ टीस्पून मिरेपूड,
१ टीस्पून शौप पाऊडर,
२ टीस्पून जीरा पाऊडर,
४-५ पुदिन्याची पान,
२ टेबलस्पून लिंबू रस,
मीठ स्वादानुसार,
बर्फाचा चुरा,
थंड पाणी.
कृती:
कैरी प्रेशर कुकरमध्ये घालून १ शिटी येईपर्यंत शिजवून घ्यावात.कैरी शिजल्यानंतर तिचा गर काढून घ्यावा.
कैरीच्या गरामध्ये साखर, मीठ, मिरेपूड, शौप पाऊडर, जीरा पाऊडर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यावे.
सर्व्ह करण्याअगोदर ह्या मिश्रणात थंड पाणी घालावे.
ग्लासमध्ये बर्फ घालून त्यावर पन्ह घालावे.
🔷फालूदा रेसिपी
साहित्य
२ कप व्हॅनिला आईस्क्रिम
१ कप फालूदा शेव
गुलाबाचे सरबत
अर्धा कप ताजे क्रीम
१ किलो दूध
२ छोटे चमचे गुलाब एसेंस
१/२ कप बदाम व पिस्ते
चार चमचे साखर
पाककृती
दूधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा.
वाढतांना एक आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका त्यावर जमवलेले दूध टाका.
मग व्हॅनिला आईस्क्रिम टाका व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाका.किंवा यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची चव वाढवू शकता.
प्रिया कणसे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment