Sunday, April 8, 2018

कोळंबी बिर्याणी


कोळंबी बिर्याणी.                              

साहित्य:

१ किलो कोळंबी.
१/२ किलो तांदूळ,
७-८ मोठे कांदे, ६ टोमॅटो,
आल लसूण पेस्ट,
२ टी स्पून पुदिना पेस्ट,
लाल तिखट, हळद, मीठ,
किचन किंग मसाला,       
मॅगी चिकन क्यूब- २,
गरम मसाला पावडर १ चमचा.   

कृती.                  
                          
कोळंबी धुवून त्याला तिखट, मीठ, आल लसूण पेस्ट, पुदिना पेस्ट , हळद लावून ठेवावे.भात मोकळा शिजवून घ्यावा. दुसरीकडे तेलावर आक्खा गरम मसाला, कांदा, टोमॅटो घालावा, त्यावर परत थोडी आल लसूण पेस्ट घालावी, लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, मॅगी क्यूब , मीठ घालून तेल सुटेपर्यत शिजवून घ्यावे. मग कोळंबी टाकून चांगले शिजवून घ्यावे. कोळंबी मसाला आणि भात यांचे थर लावून एक वाफ काढवी. हवा असल्यास वरून तळलेला कांदा आणि काजूगर घालावेत.

समता कोळवणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

डाळीचे पदार्थ-वडे,धिरडे


मिश्र डाळींचे वडे

साहित्य

अर्धी वाटी चणा (हरभरा) डाळ,
पाव वाटी मूग डाळ,
पाव वाटी उडीद डाळ,
चवीनुसार मीठ,
चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा,
अर्धा चमचा किसलेले आले,
चिमूटभर हिंग,
एक वाटी मलाईचे दही,
अर्धा चमचा चाट मसाला.
आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल

पाककृती 

अगोदर हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुऊन २ तास भिजत घालाव्यात, त्यात चवीनुसार मीठ, कीससलेले आले, हिरव्या मिरच्यांचा ठेचा व चिमूटभर हिंग घालून सरबरीत वाटून घ्यावे .

वाटणाची फार बारीक पेस्ट करू नये, तेल कडक तापवून चमच्याने गोळे टाकत खरपूस हलके तपकिरी रंगावर वडे तळावेत.

दही थोडे फेटून त्यात चवीनुसार मीठ आणि चाट मसाला कालवावा, व त्यासोबत गरम वडे सर्व्ह करावेत.

प्रिया कणसे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

डाळीचे धिरडे

साहित्य

२ वाट्या बेसन,
१चहाचा चमचा मिरची पावडर,
१ कांदा बारिक चिरुन,
चिमूटभर हळद हिंग,
अर्धा चहाचा चमचा जीरे पावडर,
मीठ चवीनुसार,
१चमचा तेलाचे मोहन,
कोथिंबीर बारिक चिरलेली

कृती

वरील सर्व साहित्य एकत्र करुन त्यात पाणी घालून ईडलीपीठापेक्षा थोडे पातळ करावे, १चहाचा चमचा तेल तापलेल्या तव्यावर घालून त्यावर डावाने हे पीठ आतून बाहेर असे गोलाकार घालत जावे, झाकण ठेवून एक वाफ काढावी, उलथण्याने उलटून दुसरी बाजूही खमंग शेकावी, गरमागरम खाण्यास द्यावे.  सोबत कोणतीही चटणी, साॅस अथवा दही छानच लागते.

दीपाली प्रसाद
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

तांदळाचे धीरडे 

साहित्य

तांदूळ पीठ येक वाटी,
काकडी किस अर्धी वाटी,
दोन मिरच्या बारीक चिरून,
कोथिम्बिर,मीठ
बेसन दोन चमचे,
तेल १ चमचा

कृती

सर्व येकत्र करून स्रसरीत पीठ भिजून पळीने पीठ घालावे .हाताला पाणी लाऊन धीरडे गोल पसारावे.लसूण चटणी बरोबर गरम धीरडे छान लागते

वैशाली मोजरकर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

मावळी काकडीचे गोड धिरडे

साहित्य-:

मावळी काकडी ( किसून) १ वाटी
गूळ ( जितकं गोड हवं त्याप्रमाणे)
तांदूळ पिठी १ १/२ वाटी
बारीक रवा २ टेबल स्पून
वेलची पूड (ऐच्छिक)

कृती-:

मावळी काकडी किसून गूळ घालून ठेवा. थोडं पाणी सुटेल त्यात मावेल इतकी तांदूळ पिठी, बारीक रवा आणि वेलची पूड घाला.
नॉनस्टिक पॅन वर धिरडी घालून थोड्या तुपावर भाजा.

अमृता बोकील
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सालाची हिरव्या मुगाच्या डाळीचे धिरडे - चिला

२ वाट्या सालाची मुगाची डाळ साधारण ४ ते ५ तास भिजवावी. नंतर ७ / ८ लसूण पाकळ्या २/३ हिरव्या मिरच्या , चवीनुसार मीठ

कृती

भिजवलेली डाळ, लसूण आणि मिरच्या मिक्सर मधून बारीक करून घ्या. नंतर चवीनुसार मीठ घालावे.  नंतर धिरडी करावी. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खायला द्या

वृषाली देशपांडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

मटार टाकोज

मटार टाकोज

साहित्य

मका दाणे ,मटार
खोबर, कोथींबीर,मिरची वाटलेली
मीठ,लिंबू रस, तेल,मैदा तांदूळ पीठ, चिस, sauce

कृती 

मका मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी त्या पेस्ट मध्ये मावेल इतकं मैदा व थोडीशी तांदूळ पीठ थोडं मोहन ओवा हे सगळं मळून घट्ट भिजवावं  १५ मिनिटानंतर छोटी पुरी लाटून तेलात टाकावी व टाकल्यानंतर झाऱ्या च्या साहाय्याने अर्धवट दुमडावि मग छान मंद आचेवर तळून घ्यावी हे टाकोज तयार
त्यातील सारण मटार च करावं ते पुढील प्रमाणे
मटार वाफवून घ्यावेत मग अर्धवट वाटून घ्यावे त्यात वाटलेली मिरची ओल खोबर लिंबू रस मीठ कोथिंबीर हे सर्व घालून एकत्र करावे व हे सारंण या टाकोज मध्ये भराव वरून हॉट न स्वीट sauce  टाकावा व चिस घालावं

प्रज्ञा विनोद

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

साबुदाणा अप्पे


साबुदाणा आवडत नाही.. असे खूपच कमी लोक आहेत... साबुदाण्याची खिचडी ,सालपापड्या..साबुदाण्याचे लाडू आणि बरंच काही...

पण साबुदाणा पचायला जड वगैरे असतो..असं काहीसं सतत कानावर येत असतं..

तरीही आम्ही साबुदाणा आणतोच..मग खिचडी गार चांगली झाल्यावर लागत नाही हा युक्तिवाद करून साबुदाणा वडे करायचे असा हट्ट होतो..

पण इकडची स्वारी थोडी जास्तच "हेल्थ कॉन्शस"
तळलेले..वर्ज्य
मग साबुदाण्याचे आप्पे..हा सुवर्णमध्य सापडला असाच कुठेतरी वाचलं या पाककृती बद्दल.. आणि आता अधूनमधून आम्ही बिनधास्त आवडीनं खातो...

आज हीच पाककृती फोटोंसह तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटली.

        साबुदाण्याचे आप्पे

साहित्य : 

भिजवलेला साबुदाणा,
शेंगदाणा कूट,
अगदी थोडी वरी भिजवून वाटलेली, उकडलेले बटाटे .
वाटलेली हिरवी मिरची, जिरं, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर .

कृती :

सोप्पंय...
सगळं साहित्य एकजीव करून घ्या.
आप्पेपात्र गरम करून त्यात  थोडे तेल घालावे.. जेणेकरून आप्पे चिकटत नाहीत.वरील मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून पात्रात मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे..

मसाला दह्यासोबत एकदम चटकदार लागतात..

सविता करंजकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

मटार व कैरी पाककृती

मटार व कैरी पाककृती

सुनंदा शिंदे

मटार  चटणी ----

ओला  मटार  एक  वाटी +ओले  खोबरे  अर्धी  वाटी +कोथिंबीर अर्धी  वाटी +हिरव्या दोन  आणि   मीठ चविनुसार मिक्सरवर  रवाळ  होईल  इतपत करा   .नंतर  एक   लहान लिंबू   त्या चटणीत  पिळाले  की  साखर  अंदाजाने  घालून . परत  एकत्र   करा  ..हिरवी   मटार  चटणी   तयार  ..मी  चटणी त  हि.मीरची न  घालताही  करते    तरीही   छान   लागते..

सुनंदा शिंदे

कैरी  नेहमी   प्रमाणे धुऊन  तुम्हाला   आवडेल  तशा  फोडी   करून   घ्यावेत  ,  हळद ,, लाल  तिखट   आणि   मीठ  सर्व   एकत्र करा  ..एक   पातेल्यात   तेल  जरा  जास्त   घाला  त्यात मेथ्या   चिमूटभर ,, अख्खा   लसूण आणि   मोहरीची  डाळ  ,हिंग  फोडणी त  घालून  चांगले   हलवीत  रहा  गुळ  आवडीप्रमाणे   घालावा .एक   वाफ  द्यावी ..गॕस  बंद   करा  २/४दिवस   राहिल..  ..आंबट   गोड   चव  चांगली   लागते..फोडणी   झाली   कि  मिश्रण   फोडणी त  घालून   नंतर   गुळ  घालावा.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

ममता संसारे

मटर खीर

मटर वाफवलेले
तूप
खवा
साखर
बदाम पिस्ता काप
गरम पाण्यात मीठ घालून मटर वाफवणे लगेच गार पाण्यात टाकावे मटरचा रंग बदलत नाही
वाफवलेले मटर बारीक वाटून घेणे एका भांडयात तूप घालून त्यावर परतुन् घेणे ग्यास बंद करणे दूध घालून चांगले मिक्स करुन गालून घेणे मग हे मिश्रण ग्यास वर ठेवणे सतत ढवलत रहाणे उकली यायला लागली की खवा घालणे थोड़े ढवलने साखर घालणे  थोड़ी अटवा बदाम पिस्ता काप घाला.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

स्वप्नगंधा नाईक

कच्च्या कैरीचे रायते

कच्च्या कैऱ्या प्रथमकुकरमध्ये वाफवून घ्या. नंतर ओल़ा नारळ,लाल मिरची व धणे वाटून घ्या. ५-६पाकळ्या लसणीच्या बारीक चिरून तेलात राई,कडीपत्त्याबरोबर फोडणीस घाला, नंतर कैरी सोलून त्यात  घाला, वाटप घालून त्यात वाटीभर गूळ घाला(७-८ कैरीसाठी),मीठ घालून एक कढ काढा,आंबट तिखट गोड रायते तयार .
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

मटार टाकोज

साहित्य - 

मका दाणे मटार खोबर कोथींबीर मिरची वाटलेली मीठ लिंबू रस  तेल  मैदा तांदूळ पीठ चिस , sauce

कृती  -

मका मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी त्या पेस्ट मध्ये मावेल इतकं मैदा व थोडीशी तांदूळ पीठ थोडं मोहन ओवा हे सगळं मळून घट्ट भिजवावं  15 मिनिटानंतर छोटी पुरी लाटून तेलात टाकावी व टाकल्यानंतर झाऱ्या च्या साहाय्याने अर्धवट दुमडावि मग छान मंद आचेवर तळून घ्यावी हे टाकोज तयार
त्यातील सारण मटार च करावं ते पुढील प्रमाणे
मटार वाफवून घ्यावेत मग अर्धवट वाटून घ्यावे त्यात वाटलेली मिरची ओल खोबर लिंबू रस मीठ कोथिंबीर हे सर्व घालून एकत्र करावे व हे सारंण या टाकोज मध्ये भराव वरून हॉट न स्वीट sauce  टाकावा व चिस घालावं

प्रज्ञा विनोद

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

डेसिकेटेड नारळ चव

डेसिकेटेड नारळ चव

🔸कमी गॅसवर कोरडाच भाजून घ्या रंग बदलला नाही पाहिजे
🔸विड्याची पाने शिरा व देठ काढून मिक्सरमध्ये कंडेन्स्ड मिल्क अथवा आटवलेल्या दुधाबरोबर वाटून घ्या.पेस्ट टाईप.
🔸हे सगळं सुक्या खोबऱ्यावर घालून थोडे आटवा
साखर घालावी व कढईतून कड सुटू लागे पर्यंत हलवावे.
🔸वड्या करतात ना तसं.
🔸आवडत असल्यास दोन थेंब हिरवा रंग घाला.
मिश्रण थंड झाल्यावर छोटे गोळे करून त्यात गुलकंद भरा.
🔸नंतर डेसिकेटेड खोबऱ्यात मध्ये घोळवा.

अंजली जोशी
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

आंबा मोदक

तृप्ती गोहिल

आज अंगारकी चतुर्थी आहे व आंबे ही बाजारात यायला लागलेत. तर बाप्पाच्या नैवेद्याला उकडीचे आंबा मोदक जरूर करून बघा. बाप्पाला व तुम्हालाही नक्की आवडतील.

.उकडीचे आंबा मोदक (Mango Modak)

उकडीचे आंबा मोदक बनवले. कसे ते पहा  साहित्य व कृती-

साहित्य :-

सारणासाठी
* खवलेलं ओलं खोबरं २ वाट्या
* साखर १ वाटी
* मँगो पल्प १ वाटी
वरील आवरणासाठी
* तांदुळाचे पीठ २ वाट्या
* पाणी २ वाट्या
* मँगो पल्प ३/४ (पाऊण) वाटी
* मँगो इसेन्स ४-५ थेंब
* मीठ चिमुटभर
* तेल/तूप २ टीस्पून

कृती :-

प्रथम खोबरं, साखर व मँगो पल्प एकत्र करून सारण साधारण कोरडे होईपर्यंत शिजवून तयार करावे. थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.

आता दोन वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये आधी चिमुटभर मीठ व दोन चमचे तेल /तूप घालावे. उकळी आली की मँगो पल्प व इसेन्स घालावे व सर्व एकत्र उकळू लागले की लगेच तांदुळ पीठी घालावी व रवीच्या टोकाने व्यवस्थित गुठळी होणार नाही याची काळजी घेऊन ढवळावे. व गँस बंद करून झाकणी घालून १५ मिनिटे ठेवून द्यावे.

पंधरा मिनिटानंतर तयार उकड तेल पाण्याच्या हाताने चांगली मळून,  एका भांङ्यामधे झाकून ठेवावी.
आता त्यातील थोडी-थोडी उकड घेऊन हाताने किंवा साच्याने आधीच तयार केलेले सारण भरून मोदक तयार करावेत व चाळणीवर किंवा मोदक पात्रात १५ मिनिट वाफवून घ्यावेत.

गरमा-गरम गोड लुसलुशीत मोदक साजूक तुपाची धार सोडून खायला द्या.

या मोदकांचा रंग अतिशय सुंदर व मोहक दिसतो की बघताच क्षणी खावे वाटतात. व चवही अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा नक्की आवडतील.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

लोणची

लोणची

मोरावळ्याचे लोणचे
  
साहित्यः
        ताजे टपोरे मोरावळे,तिखट,मीठ,हळद, हिंग,तेल

कृतीः

  पहिल्यांदा मोरावळे ५-७ मि. पाण्यात शिजवून घ्यावेत.थंड झाल्यावर त्याच्या फोडी करुन घ्याव्यात. अंगठा आणि बोटामधे दाबले तर आपोआप फोडी पडतात.फोडणसाठी तेल गरम करावे. त्यात हिंग हळद तिखट मीठ व आवळ्याच्या फोडी घालून  चांगले एकत्र करावे.हवे तर फोडणीत थोडा लोणच्याचा मसाला पण घालता येईल.3-4 दिवस बाहेर व ८-१० दिवस फ्रिजमध्ये टिकते.

डॉ.अस्मिता भस्मे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

ओली  हळदीचे  तिखट   लोणचे .

साहित्य

-ओली  हळदीचे   काप  ,हिरव्या   मिरच्या तुकडे , मीठ  ,लिंबूरस   अंदाजाने  सगळे   एकत्र   करून   घ्या ...  मोहरी  व थोडे    मेथीचे  दाणे    गरम  करुन  मिक्सर   मधून   बारीक  करा  

कृती

वरील   जिन्नस सर्व  एकत्र करा  ...तेल चांगले गरम करून   थंड   झाल्यावर  वर   त्या      मिश्रणात   घालावे ....तिखट   लोणचे    तयार.

सुनंदा शिंदे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

आंबे हळद लोणचे

साहित्य

२५०ग्राम हळद
१००ग्राम तेल
२ चमचे मीठ
अडीच चमचे लाल तिखट
अडीच चमचा बेडेकर लोणचे मसाला
अर्धा चमचा मेथी
अडीच चमचे मोहरी डाळ
पाव चमचा हिंग
लिंबू रस अर्धा कप

कृती

पहिले हळद धवून सुती कापडावर सुकवून घ्यावी नंतर हळद मिक्सरला थोडी जाडसर वाटून घ्यावी. कढईत तेल गरम करून थोडे थंड झाले की त्यात हिंग, मेथी, मोहरी डाळ, तिखट, लोणचे मसाला घालून त्यात हळद घालून मीठ व लिंबूरस घालून चांगले एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.

अभिलाषा शिंपी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

ओल्या हळदीचे लोणचे

साहित्य

ओली हळद, आलं, लिंबूरस, मीठ,मोहरीच तेल, मोहरी, मेथ्या

कृती

ओली हळदीचे साल काढून हवं तसं किसून अथवा बारीक चिरून घेणे.
आलं साल काढून किसून घेतले
ओली हळद न आलं मिक्स करुन त्यात मीठ न लिंबूरस मिक्स केला
हे मिश्रण असेच ३-४ तास मुरू दिलं.
मोहरी ची तेल गरम करून ,थंड करायला ठेवलं.
मोहरी न मेथ्या भाजून त्याची भरड हळद आल्याच्या मिश्रणात मिसळली न वरुन थंड झालेल तेल घातलं.

आई ची रेसिपी आहे..
पण झटपट होत आणि चविष्ट ही.

जयश्री खराडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

ओल्या हळदीचे लोणचे

साहित्य

ओली हळद पाव किलो, एकचमचा मीठ, तीन लिंबांचा रस, सहा चमचे साखर

कृती

आल्ं धुऊन सालं काढून जाडसर किसून घ्यावं. त्यात तीन लिंबांचा रस, साखर

मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावे. दोन दिवसात लोणचे खायला तयार. हे आंबटगोड लोणचे खायला छान लागते. फ्रीजमध्ये ठेऊन  महिनाभर टिकते. तेलमसाल्याचा वापर नाही. डायबेटिस साठी ओली हळद गुणकारी असते.

मंगला डोंगरे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

फळांची कोशिंबीर

फळांची कोशिंबीर

सुनंदा शिंदे

सफरचंद एक  + डाळींब 1/2 वाटी    किंवा   तुमच्या   अंदाजाने +घट्ट दही +मीठ +  थोडा सा  चाट   मसाला  आवडत   असेन  घालावा   +चिमूटभर   साखर   -----उपवासाची कोशिंबीर   तयार

साहित्य ---

अननसाचे  काप   +चार  लवंगा  +वेलदोडे पूड  +साखर ,,हे  सर्व एकत्र   करून   एका   स्टिलच्या  पातेल्यात   घेऊन   गॕसवर एक तारी  पाक  होऊ   लागला   कि  गॕस  बंद   करणे.. महत्त्वाचे   म्हणजे   शेवटी   वेलदोडे पूड   घालावी .

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

पोपटी

पोपटी

_नवीमुंबई शेजारील उरण, पनवेल, पेन, अलिबाग तालुक्यात जानेवारी ते मार्च महिन्यात तयार केली जाणारी पोपटीची रेसिपी.

वाढणी-५ जणांसाठी.

लागणारा वेळ: ४५ मिनिटे

पोपटीचे साहित्य:

२ किलो गोड्या वालाच्या शेंगा (सोबत तुरीच्या शेंगा आणि मटार घेतली तरी चालते)
मामोडा (भांबुर्डीची) पाने
भरपुर पेंढा/पला-पाचोळा, सरपण
१ सर्व साहित्य बसेल मातीचा माठ
मीठ चवी प्रमाणे

हवे असल्यास
👇🏻👇🏻👇🏻
बटाटे ५
अंडी ५
चिकनचे ५ ते ६ पीस मोठ्या आकारात कापलेले आणि दही १ वाटी, धणे पावडर २ च चमचे, जिरे पावडर २ चमचे,,आलं-लसूण पेस्ट ४ च चमचे,,व्हिनेगार २ च चमचे, मीठ-तिखट चवीपुरते, तंदुरी मसाला चमचे, लिंबुरस २ च चमचे, चाट मसाला या पासून तयार केलेल्या मिश्रणात ३ ते ४ तास मेरीनेट केलेले
चिकन बांधायला केळीची पाने (चिकन बांधून टाकल्याने त्याचा मसाला इतर वस्तूंना लागत नाही)

_(पोपटी फक्त वालाच्या शेंगाची केली जाते वरील सर्व पदार्थ पर्यायी आहेत)_

क्रमवार मार्गदर्शन:

पोपटी ही एक गावरान पाककृती आहे. उरण, पनवेल, पेन, अलिबाग परिसरात जे वाल पिकतात त्यांना गोडेवाल म्हणतात. अशा वालच्या शेंगा घ्याव्या. या शेंगा अवश्यकता वाटल्यास धुवून घ्याव्या. बटाटे धुवून घ्यावेत.
चिकनचे पीस सुद्धा केळीच्या पानात बांधून घ्यावेत. २ पिसचा १ बंच करावा.
मातीचे मडके घेऊन त्याच्या तळाच्या पाव भागात सर्वात खाली मामोड्याचा (भांबुर्डीचा) पाला भरावा. चवीप्रमाणे मीठ मग त्यावर वालच्या शेंगा, बटाटे, अंडी, चिकनचे तयार केलेले बंच आणि पुन्हा चवी प्रमाणे मीठ टाकावे. उरलेल्या जागेत मामोड्याचा (भांबुर्डीचा) पाला ठासुन भरावा.
एका उघड्या जागी (ज्या ठिकाणी आग पेटविता येईल) माठ उपडा करून ठेवावा त्यच्यावर जमा केलेला पेंढा (पालापाचोळा) एकत्र करावे. मामोड्याचा पाला ठासून भरलेला असल्यामुळे आतल्या वस्तू बाहेर येत नाहीत) आणि शेकोटीरूपी आग लावून द्यावी. माठाच्या सर्व बाजूंनी पालापाचोळा जळत असेल याची दक्षता घ्यावी. २५ ते ३० मिनीटे असाच जाळ राहू द्यावा. आपण ठेवलेला माठ लालबुंद झालेला आपणांस आढळून येईल. काठीने तो माठ बाहेर काढावा. काठीनेच वर भरलेला मामोड्याचा पाला काढावा (माठातली वाफ हातावर येऊ नये म्हणून). मग़ शेंगा, बटाटे, चिकन, अंडी काढून घ्यावी. आणि गरम गरम शेंगा सोलून खाव्या. शेंगा खाल्यावर ३० मिनीटे पाणी पिण्याचे टाळावे.

चेतन गावंड, उरण-रायगड
(९८१९७५९१०५)

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट.

कोथिंबीर वडी

वृषाली गोखले

कोथींबीर वडी

साहित्य

बारीक चिरलेली कोथिंबीर 2 वाट्या,
2 पाकळ्या लसूण,
लाल तिखट,
मीठ,बेसन पीठ
मऊ भात..

कृती

सगळं,मीश्रण एकजीव करून,
पसरट थाळीला तेल लावून,वरण~भाताच्या कुकर सोबतच,शिजवायचे...
फक्त त्यात पाणी जाऊ न देण्यासाठी,त्या थाळीवर झाकण ठेवून मगच कुकर मध्ये,वरणभाताबरोबर ठेवायचे..!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

कैरीचे पदार्थ

बाळकैरी चे लोणचे

(आजी चा पाहुणचार)
रामनवमी, हनुमान जयंती झाली  बाळकैरी करता लागणाऱ्या कैऱ्या तयार होतात...
तेंव्हा आमची आजी मोसमातील पहिले लोणचे घालायची...
ते म्हणजे बाळकैरी चे लोणचे...🍏
बाळकैरी म्हणजे कोय नसलेल्या कैरी...
अगदी सोपी पद्धत पण तेवढेच चवदार....
या लोणच्याचे वैशिष्ट्य म्हणजे ३ते ४ महिन्या नंतर या लोणच्याच्या फोडी अगदी तोंडात विरघळतात....
हे बाळकैरी चे लोणचे अगदी कमी तेलात तयार होते...
पण २दिवसा नंतर या लोणच्याला च स्वतः रस्सा सुटतो...

साहित्य :

१किलो : बाळकैरी (बाळकैरी म्हणजे कोय (गुठळि) नसलेली कैरी)
१२५ग्राम : मीठ (1 वाटी मीठ)
१00 ग्राम : मोहरी ची दाळ (एक वाटी)
१00 ग्राम : लाल तिखट (एक वाटी)
२ चमचे (छोटा) : हळद
५ग्राम : हींग
२ चमचे : मेथी
१२५ ग्राम : तेल (एक वाटी तैल)

कृती:

प्रथम बाळकैरी स्वछ पुसून घेऊन त्याचे चार भाग करा आतील कोयी काढून टाका.
(परन्तु कैरी च्या फोडी वेगळ्या करु नये)
भरलेले वांगे🍆 करतो तसे ......
नतर एका भांड्यात तेल(छोटे 2 चमचे) गरम करुन त्यात मेथी टाकावी व काळपट लाल होईस्तो परतावी..
व बाजूला ठेऊन द्या..
नंतर दुसर्या एका कढईत उरलेले तेल गरम करावे...
तेल खूप गरम करू नये...  खूप गरम तेल असेल तर तिखट, मोहरी ची डाळ जळू शकतो.... म्हणून तेल जरा गरम करून गॅस बंद करावा.... मग त्या तेलात .....
मोहरीची डाळ टाकून अगदी अर्धा मिनिट परतवा ...
नतर लाल तिखट, हळद, हींग व् मीठ टाकून ३ ते ४ मिनिट परतावे. व त्यात आपण सुरवातीला तळलेले मेथी दाणे टाकावे...
जर हे मिश्रण छान परतल्या गेलं तर च हे लोणचे वर्षभर राहील... म्हणून हा मसाला छान परतल्या गेला पाहिजे जर तुम्हाला वाटलं तर परत तुम्ही गॅस चालू करू शकता...
व हे मिश्रण थंड होउ द्यावे. (अर्धा ते १तास)
नतर ते मिश्रण त्या बाळकैरी त भरावे..

४ते ५ तासांनी काचेच्या बरणीत भरावे व दर एक दिवसा आड त्या लोणचे हलवत रहावे.
वरतुन तेल टाकायची गरज नाही . या लोणच्यालाच २ दिवसांनी रस्सा सुटतो...
हे बाळकैरी चे लोणचे जसे जसे मुरेल तसे हे अजून चविष्ट होईल..
आणि ६महिन्या नंतर अगदी या लोणच्या फोडी तोंडात विरघळतील....
हे लोणच वर्ष भर टिकतात......
घट्ट वरण व् कांदा ...तैल सोबत लोणचं हा तर उन्हाळ्याचा मेनू...
फार चविष्ट !!!
हे लोणच कैरी लहान असतात तेव्हा करतात..

प्रिया कणसे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

मेथाम्बा

कैरी पाव किलो,गूळ अर्धा k .
मिरची पावडर दोन चमचे
मीठ मेथी दोन चमचे मोहरी तेल

कृती

कैरी साल काढून चिरावी.हिंग मोहरी मेथी फोडणी करून कैरी घालावी.एक वाफ काढून गूळ घालून घट्ट पाक करावा.मसाला मीठ घालावे.

वैशाली मोजरकर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

कैरीची उडदामेथी आमटी (प्रमाण: चौघांसाठी)

कोकणात कैरीची आमटी विविध प्रकारे केली जाते.आमच्या घरी आनंदात नांदणाऱ्या सिंधुदुर्गीय- गोमंतकीय - कारवारी मिश्र खाद्यसंस्कृतीत चैत्रात कैऱ्या मिळू लागल्या की ही कैरीची उडदामेथी सर्रास केली जाते आणि आम्ही सर्व आवडीने तिच्यावर ताव मारुन जेवतो. ही आमटी वाळलेल्या गरमागरम भाताबरोबर किंवा गरमागरम फुलक्यांसोबत खायला मला फार आवडते.

साहित्य:

१ कैरी,
पाव वाटी (२ टेबलस्पून) गूळ किसून किंवा पूड करुन,
१ कप ओले खोबरे कातलेले,
१ चमचा हळदीची पूड,
१ चमचाभर उडदाची डाळ,
१ चमचा मेथीचे दाणे,
१ चमचाभर धणे,
१ चमचा तांदूळ,
३-४  काळ्या मिरीचे दाणे,
२-३ सुक्या बेडगी मिरच्या,
अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, मीठ चवीप्रमाणे,
एक-दीड चमचा तेल आणि २ ते अडीच वाट्या पाणी

पाककृती:

प्रथम कैरी चांगली धुवून, सोलून (कैरीची कोय कोवळी असेल तर ती ही वापरु शकतो. टणक झाली असल्यास मात्र ती काढून टाकावी)तिचे आवडीप्रमाणे छोटे तुकडे करावेत आणि त्या तुकड्यांना थोडे मिठ चोळून ठेवावे.
एका जाड बुडाच्या पातेल्यात थोडेसे तेल गरम करुन त्यात उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे, धणे, तांदूळ, काळी मिरी व सुक्या बेडगी मिरच्या हे सर्व जिन्नस डाळ-तांदुळावर सोनेरी रंग चढेपर्यंत भाजून घ्यावेत.  भाजलेले जिन्नस व ओले खोबरे एकत्र करुन थोडे थोडे पाणी घालून गंधासारखे बारीक वाटून घ्यावे.
आधी घेतलेल्या पातेल्यातच उरलेले तेल घालून ते गरम होताच  मोहरी, उरलेले मेथी दाणे, हिंग व हळद पूड घालून  फोडणी करावी.
मीठ लावलेले कैरीचे तुकडे त्यांवर थोडे पाणी ओतून त्या पाण्यातून निथळवून घ्यावेत (असे केल्याने कैरीची आम्लता किंचित कमी होते व आम्लतेचा त्रास असलेल्या खवय्यांना ती बाधण्याची शक्यता पण कमी होते).
आता हे कैरीचे तुकडे केलेल्या फोडणीवर घालून दोन -तीन मिनिटभर चांगले परतून घ्यावेत. नंतर त्यावर अर्धा कप पाणी ओतून झाकून मध्यम आचेवर तीन-चार मिनिटे ते मिश्रण शिजू द्यावे. कैरी शिजायला फार वेळ लागत नाही. तीन चार मिनिटांनी शिजलेल्या कैरीच्या मिश्रणात आधी करुन ठेवलेले वाटण घालून ढवळून एकजीव करुन घ्यावे. लगेच शेगडीची आच मंद करुन आमटीत उरलेले पाणी (मी शक्यतो वाटण केलेले भांडे धुऊन ते पाणी वापरते), चवीप्रमाणे मीठ व गूळ घालून झाकण ठेवून आणखी तीन -चार मिनिटे आमटी मंद आचेवरच शिजू द्यावी.

सौ. प्रीति कामत-तेलंग
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

मेथ्यांबा
कैरी पाव किलो
४चहाचे चमचे मिरची पावडर
पाव किलो किसलेला गूळ
२चहाचे चमचे चमचे मेथी
चिमूटभर मीठ
४चहाचे चमचे तेल

सर्व मिश्रण एकत्र ढवळून कुकरमध्ये ४ - ५ शिट्या घेणे, आणि मोहरीचा तडका देणे.
थंड झाल्यावर छान उन्हाळी तोंडीलावणे तयार होईल.

दीपाली प्रसाद
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

विदर्भात सणांना नात्यांइतकच महत्त्व... प्रत्येक सणाचा थाट-सरंजाम वेगळाच..!
अर्थात प्रत्येक च सणाला नागपूरला माझी हजेरी अवघडच होती, थोडे थोडे पदार्थ आताशा शिकलेय.

चैत्र पाडवा अन् अक्षयत्रितीया या दोन दिवशींचा अत्यंत महत्त्वाचा नैवेद्य च म्हणा कि " कैरी पन्हे" ,नं
पण पुण्याकडे होतं त्याहून फार वेगळं आणि "शाही"...
४६°से. चा पारा झेलण्यासाठी फक्कड उपाय.

कैरी पन्हे

साहित्य :

कैरी, गूळ, साखर, मीठ,पानाचा विडा (अर्थात घरी २ पानांना चुना,कात, सुपारी, लवंग, वेलची लावून बांधलेला), चारोळी, काजू,बदाम पूड वेलचीपूड, भाजलेल्या जिरे ची पूड.
वाळा आणि गव्हूला कचूला (विदर्भात या नावाने वाळलेल्या पान न मुळयांचा वाटा मिळतो. शरीराला थंडावा देणारे.)

कृती :

बाजरातून नवीन आणलेल्या छोट्याशा मातीच्या माठाला स्वच्छ धुवून, वाळा न गव्हूला कचूला आदल्या दिवशी रात्री पुरेशा पाण्यात भिजवून ठेवावा.

* कैरी उकडून गर काढून घ्यावा, या गरात सव्वा पट समप्रमाणात विभागून गूळ-साखर मिक्स करावे. यात पाणी मिसळून किंचित मोठ्या आचेवर उकळण्यासाठी ठेवावे.
* आदल्या दिवशी भिजवलेले वाळा न गव्हूला कचूला मिक्सर मधून काढून घ्यावे, त्याच सोबत बनवलेला विडा देखील मिक्सर मधून बारीक करून घ्यावा.
* वरील दोन्ही गोष्टी पाणी टाकून व्यवस्थित गाळून घ्याव्या.
* हे पाणी ग्एस वरील पन्ह्यात हळूहळू मिक्स करावे.
* वेलचीपूड, जिरे पूड न मीठ घालावे.
* चारोळी न काजू बदाम पूड घालून चांगल्या ४-५ उकळ्या काढाव्यात.
* पन्हे थोडंसं दाट होत जातं.
* आच बंद करावी आणि पन्ह थंड होऊ द्यावे.
* थंड झाले की नवीन आणलेल्या माठात "मानचे पन्हे"ओतून ठेवावे.
* याचा देवाला आणि पूर्वजांना नैवेद्य दाखवतात.

महत्त्वाच म्हणजे हे पन्हे त्यादिवशी खाता येत नाही, दुसरया दिवशी खाता येत.आमरसासारख खातात याला जेवणात,ग्रहांच्या पिठाच्या पातळ पापङया, कुरडया आणि कणकेच्या गूळ टाकून केलेल्या पातळ न कडक तळलेल्या पुरया.

अहाहा... आठवूनच खाल्ल्याच समाधान मिळालं..😌😌.

जयश्री खराडे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

चित्रान्न उन्हाळ्यातील खास भात    

३ वाट्या भात कुकरमध्ये मोकळा शिजवून घ्यावा शिजवताना थोडेसे मीठ घालावे म्हणजे भात मोकळा होतो भात परातीत काढून गार करावा १ वाटी कैरीचा किस घ्यावा दाणे तेलावर तळून घ्यावेत अर्धी वाटी तेल घ्यावे त्यात मोहरी हिंग ६ लाल मिरच्या कढीपत्ता जिरे तीळ डाळं अर्धी वाटी घालून फोडणी करावी गार भातावर फोडणी गार करून घालावी मीठ थोडी साखर दाणे आणि कैरी घालून भात मिक्स करावा वरून कोथिंबीर घालावी मस्त चटकदार कैरी भात तय्यार

अर्चना
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

कैरीचे रायत

कैरी उकडून घ्यावी, कोय।बाट काढून गर कुस्करून घ्यावा, त्या मधे आंबटपणा बघून  गुळ घालावा, कांदा बारीक चिरून घ्यालावा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घालावी, चवीनुसार मिठ घालून व्यवस्थित मिक्स करुन घेणे, भाकरी बरोबर खायला खुप छान लागते.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

वंदना मंकीकर

कैरीची सुरळीवडी......
कैरीचे सारण करायचे.आंबट तिखट गोड असे..
कव्हर - उकडलेला बटाटा आणि ़ब्रेड चा चुरा मिसळून ...पारी लाटून त्यात सारण भरावे...शॅलो  फ्राय करावे

गौरी घाटगे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कैरी चे  करम  -

----कैरी  धुवून  स्वच्छ   रूमालाने  पुसून  कोरड्या   कराव्यात   . त्याचे  काप    करून   हळद  ,मीठ , लाल  मिरची   पावडर   हे  सर्व     मिश्रण   एकत्र   करा..  लसूण   आवडत   असेल तर  अख्खा च  थोडासा   लाटण्याने  दाबून  तेलात  हिंग  व  लसूण घालून   फोडणी   बाजूला   ठेवा   .नंतर   करम  मधे  तेल  घालावे   लागणार आहे   ते  चांगले  कडकडीत  करुन  गार  झाल्यावर    हे  तेल  व  हिंग  ,लसूण ची  फोडणी   सर्व  एकत्र   करा   तातपूर्तच  करावे ..जास्त   दिवस   राहणार   नाही ..

सुनंदा शिंदे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कैरीचे पन्ह आणि डाळ

कैरी पन्हे करण्या साठी कैरी साल काढून कुकर मध्ये उकडून घ्यावी मग गार झाल्यावर गर काढून गुळ मीठ व वेलची पावडर घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यावी , मीठ हि घालावं , ह्यात पाणी घालून जेवढे पातळ हवे त्या प्रमाणे करून घ्यावे

कैरी ची डाळ करण्या साठी चण्याची डाळ भिजत घालावी साधारण 4 ते 5 तास, नंतर उपसून घ्यावी आणि भरड वाटावी, वाटतानाच त्यात हिरवी मिरची ,आले , मीठ व साखर घालावी, त्यात नंतर कैरी किसून घालावी

सोनाली धारणे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा