Thursday, April 5, 2018

कोळ भात

कोळ भात

ही एक सारस्वती रेसिपी. उन्हाळ्यात पोटाला थंडक देणारी. माझ्या मते ही रेसिपी सारस्वती असली तरी ही मध्यप्रदेशातील सारस्वतांची आहे.

कोळ रेसिपी
२ कांदे
१/२ वाटी सुके खोबरे किसून
७-८ काळी मिरी
५ काजू
२चमचे चारोळ्या
२ लहान चमचे मिरची पावडर
१ लहान कांदा फोडणी साठी
१ सुकी लाल मिरची
१चमचा तूप
चिंचेचा कोळ
दुध
चवीनुसार मीठ

कृती

२कांदे सालं न काढता गॅस वर भाजून घ्या
खोबरे कढईत सोनेरी  रंगावर भाजून घ्या
आता कांदा खोबरं काळी मिरी काजू चारोळ्या आणि लाल तिखट घालून त्याला वाटून घ्या
आता त्यात दुध आणि चिंचेचा कोळ घालून त्याला आमटी form इतके पातळ करावे ( थोडे दाटसर ठेवा)
आता लहान कढईत तूप घालून त्यात एक कांदा बारीक चिरून आणि १खडी लाल मिरची घालून परतून फोडणी करावी
चवीनुसार मीठ घालावे.
हा कोळ थंड च असतो.
कृपया उकळवू नये.
गरम गरम भाताबरोबर खावा.
सोबत कांद्याची भजी आणि बटाटा ची तळसलेली भाजी नक्की करावी..

सविता काइंगडे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment