लोणची
मोरावळ्याचे लोणचे
साहित्यः
ताजे टपोरे मोरावळे,तिखट,मीठ,हळद, हिंग,तेल
कृतीः
पहिल्यांदा मोरावळे ५-७ मि. पाण्यात शिजवून घ्यावेत.थंड झाल्यावर त्याच्या फोडी करुन घ्याव्यात. अंगठा आणि बोटामधे दाबले तर आपोआप फोडी पडतात.फोडणसाठी तेल गरम करावे. त्यात हिंग हळद तिखट मीठ व आवळ्याच्या फोडी घालून चांगले एकत्र करावे.हवे तर फोडणीत थोडा लोणच्याचा मसाला पण घालता येईल.3-4 दिवस बाहेर व ८-१० दिवस फ्रिजमध्ये टिकते.
डॉ.अस्मिता भस्मे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ओली हळदीचे तिखट लोणचे .
साहित्य
-ओली हळदीचे काप ,हिरव्या मिरच्या तुकडे , मीठ ,लिंबूरस अंदाजाने सगळे एकत्र करून घ्या ... मोहरी व थोडे मेथीचे दाणे गरम करुन मिक्सर मधून बारीक करा
कृती
वरील जिन्नस सर्व एकत्र करा ...तेल चांगले गरम करून थंड झाल्यावर वर त्या मिश्रणात घालावे ....तिखट लोणचे तयार.
सुनंदा शिंदे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
आंबे हळद लोणचे
साहित्य
२५०ग्राम हळद
१००ग्राम तेल
२ चमचे मीठ
अडीच चमचे लाल तिखट
अडीच चमचा बेडेकर लोणचे मसाला
अर्धा चमचा मेथी
अडीच चमचे मोहरी डाळ
पाव चमचा हिंग
लिंबू रस अर्धा कप
कृती
पहिले हळद धवून सुती कापडावर सुकवून घ्यावी नंतर हळद मिक्सरला थोडी जाडसर वाटून घ्यावी. कढईत तेल गरम करून थोडे थंड झाले की त्यात हिंग, मेथी, मोहरी डाळ, तिखट, लोणचे मसाला घालून त्यात हळद घालून मीठ व लिंबूरस घालून चांगले एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.
अभिलाषा शिंपी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ओल्या हळदीचे लोणचे
साहित्य
ओली हळद, आलं, लिंबूरस, मीठ,मोहरीच तेल, मोहरी, मेथ्या
कृती
ओली हळदीचे साल काढून हवं तसं किसून अथवा बारीक चिरून घेणे.
आलं साल काढून किसून घेतले
ओली हळद न आलं मिक्स करुन त्यात मीठ न लिंबूरस मिक्स केला
हे मिश्रण असेच ३-४ तास मुरू दिलं.
मोहरी ची तेल गरम करून ,थंड करायला ठेवलं.
मोहरी न मेथ्या भाजून त्याची भरड हळद आल्याच्या मिश्रणात मिसळली न वरुन थंड झालेल तेल घातलं.
आई ची रेसिपी आहे..
पण झटपट होत आणि चविष्ट ही.
जयश्री खराडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ओल्या हळदीचे लोणचे
साहित्य
ओली हळद पाव किलो, एकचमचा मीठ, तीन लिंबांचा रस, सहा चमचे साखर
कृती
आल्ं धुऊन सालं काढून जाडसर किसून घ्यावं. त्यात तीन लिंबांचा रस, साखर
मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावे. दोन दिवसात लोणचे खायला तयार. हे आंबटगोड लोणचे खायला छान लागते. फ्रीजमध्ये ठेऊन महिनाभर टिकते. तेलमसाल्याचा वापर नाही. डायबेटिस साठी ओली हळद गुणकारी असते.
मंगला डोंगरे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment