लाल भोपळा
लाल भोपळ्याच्या फोडी करा.
फोडणीत मोहरी ,मेथी ,कढीपत्ता घाला हिरवी मिरचीचे वाटण,व
फोडी टाका
पातेल्यावर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवा .एका वाफेत भाजी होते ,ऊतरल्यावर कोथिंबीर व ओलं खोबरं घाला ..
ऊपासाची करायची असेल तर तूप जिऱ्याची फोडणी व दाण्याचं कूट घाला . हिरवी मिरची जास्त छान लागते .
डॉ.वृंदा कार्येकर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
लाल भोपळ्याची भाजी , ही माझ्या मैत्रिणीच्या सासरी करतात मध्य प्रदेश मध्ये, चवीला खूपच मस्त चटपटीत लागते.
साहित्य-:
पाव किलो लाल भोपळा
दोन मोठे कांदे
दोन हिरव्या मिरच्या
दहा ते बारा मेथी दाणे
अर्धा चमचा आमचूर पूड
एक चमचा जिरे
हळद
दोन चमचे गूळ
कृती-:
सालासकट भोपळ्याच्या फोडी करून घ्या. कांदे उभे पातळ कापून घ्या.
तेलात (जरा सढळ हाताने घ्या) मेथी दाणे घाला, लालसर झाले की जिरे, हिरवी मिरची घाला त्यावर कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्या ( बिर्याणी वर घालतात तसा) मग हळद, लाल भोपळ्याच्या फोडी घालून पाणी न घालता शिजवा ( फोडी शिजाव्यात पण लगदा होऊ नये)
त्यात गूळ , आमचूर पूड घाला आणि कोथिंबीर घालून वाढा.
अमृता बोकील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment