Thursday, April 5, 2018

कणकेचे लाडू

कणकेचे लाडू

साहित्य

       गव्हाचे पीठ ४ वाट्या
        पिठीसाखर ३ वाट्या
         तूप २ वाट्या
         ८-१० वेलदोड्यांची पूड
         बेदाणे

कृती

  जाड बुडाच्या कढईत तूप आणि कणिक एकत्र करुन मंद गॅसवर लालसर भाजून घ्यावे.भाजून होत आले की खमंग वास  सुटतो. स्टोव्ह वरुन उतरवून त्यात पीठीसाखर  आणि वेलदोड्याची पूड चांगली मिसळून मिश्रण चांगले दाबून ठेवावे. पाच एक मिनिटांनी मिश्रण गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळतानाच वरुन बेदाणे लावावेत.

डॉ.अस्मिता भस्मे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कणकेचे लाडू

साहित्य

१वाटी थोडी जाडसर दळलेली कणिक
तूप तळण्यासाठी
पिठीसाखर चवीनुसार
वेलीची पावडर
जायफळ पावडर

कृती

प्रथम कणिक थोडे पुरीप्रमाणे भिजवून घ्यावी. नंतर त्याचे पुऱ्या करून तळून घ्याव्यात. नंतर थोड्या थंड झाले की त्या मिक्सरला बारीक करून घेऊन रव्याच्या चाळनीने चाळून घ्यावे. आणि नंतर त्यात पिठीसाखर चवीनुसार, वेलीची पावडर, जायफळ पावडर हे साहित्य एकत्र करून घेऊन त्याचे लाडू वळावेत. हे लाडू खूप छान लागतात.

अभिलाषा अमोल शिंपी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

१वाटी ज्वारीचे पीठ
१/३ वाटी पीठी साखर
१/२ साजुक तूप
वेलची पूड

कृती

पीठ, पीठी साखर, वेलची पूड आणि तूप एकत्र करून चांगले मळून घ्या. कोरड झाले असे वाटले तर थोडे तूप घालावे. मळून झाल्यावर छोटे  चपटे गोळे करावे. आवडत असेल तर काजू पाकळी वर लावावी.
ट्रेला थोडे तूप लावावे. थोडे पीठ भुरभुरावे. ओव्हन ला१५० अंश ला २० ते २५ मिनिटे ठेवावे.

वृषाली देशपांडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

१वाटी गवहाचे पिठ  १वाटी गुळ १/२ वाटी साजूक तूप  आवडी नुसार ड्रायफ्रूट    कृती प्रथम तूपात गव्हाचे पिठ खमंग भाजणे त्यातच गूळ टाकून पुन्हा भाजत रहावे वेलची पावडर व इतर जीन्नस टाकणे गरमच ताटात पसरवून वड्या पाडणे
स्मिता धर्माधिकारी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कृती

सर्व कडधान्यं, तांदूळ सम प्रमाणात घेऊन त्यांना मोड काढावेत,
मोड काढलेली धान्य उन्हात कडकडीत वाळवावेत व गिरणीतून दळून आणावेत,
हे झाले प्रोटीन चे पीठ
या पिठाचे लाडू
२ वाटी प्रोटीन पीठ
१.५वाटी गूळ
१वाटी साजूक तूप
वेलची, जायफळ
कणकेच्या लाडू प्रमाणे करायचे

शिल्पा कापुरे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कणकेचे लाडू

पाव किलो जाड कणिक ( अग्रजची मिळते पुण्यात)
गूळ (रुचियानाची ऑरगॅनिक गूळ पावडर) जस गोड हवं त्याप्रमाणात
खारीक पूड
सुकामेवा पूड
वेलचीपूड
सुकं खोबरं ( किसून, भाजून)
खसखस ( भाजून)

कृती

कणिक मंद गॅसवर तुपावर भाजावी, खमंग वास येतो, लालसर होते.
एक ताटात गूळ पावडर, खारीक पूड, सुकामेवा पूड, खोबरं, खसखस घ्यावी आणि भाजलेली कणिक ( थोडी कोमट झाल्यावर) घालून मळून लाडू वळावेत.
हे मी माझ्या दीड वर्षाच्या लेकीसाठी करते

अमृता बोकील
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

गव्हाचे पीठ २वाट्या
पाऊण वाटी तूप
१वाटी किसलेला गुल
अर्धा चहाचा चमचा वेलची पावडर
अर्धी वाटी किसलेले खोबरे, खसखस, तील हे सर्व भाजून एकत्र करणे
मंद गँसवर गहूपीठ खमंग भाजणे, हलूहलू त्यात तूप जिरवणे, शेवटी गैस बंद करुन त्यात गूल व अर्धे खोबरे मिश्रण मिसलून घेणे. तूप लावलेल्या थालीत हे मिश्रण थापून वरुन उरलेल खोबरेे मिश्रण लावून व काजू काप अथवा बदामकाप अथवा चारोले लावून सजवणे, वड्या कापून घेणे.

दीपाली बोधे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment