Thursday, April 5, 2018

उपमा

उपमा ( आईची रेसिपी)

जाड रवा ( कोरडा भाजलेला)
बारीक चिरलेला कांदा
उडीद डाळ
हरभरा डाळ (डाळी भिजवून)
काजू तुकडे
कढीपत्ता
मोहरी
बेडगी मिरची
आले हिरवी मिरची ठेचा
लिंबू रस, साखर, मीठ

कृती

तेलात उडीद डाळ, हरभरा डाळ लालसर परतून घ्या मग मोहरी , बेडगी मिरची, कढीपत्ता, कांदा घाला. कांदा मऊ झाला की ठेचा घाला. थोडं परतून रवा घाला, खमंग भाजा. थोडं थोडं तूप घाला. मीठ घालून आधण पाणी घालून दणदणीत वाफ दया. लिंबू रस, ओला नारळ चव, कोथिंबीर, बारीक शेव घालून सर्व्ह करा.

उप्पीट-:
तेलात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे घालून भाजलेला रवा घालून शिजवा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

सांजा-:
तेलावर जिरे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे, भाजलेला रवा घालून थोडा तुपावर खमंग भाजून आधणाचे पाणी घालून शिजवा. मीठ साखर घालून सुक्या खोबऱ्याचा किस घालून सर्व्ह करा. हे जरा गोडसरच असतं.

अमृता बोकील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment