Thursday, April 5, 2018

ढोकळा

ढोकळा पीठ

साहित्य

पावणे २ किलो चणाडाळ
दिड किलो तांदूळ
पाव किलो उडीदडाळ
अर्धा किलो साखर
१००ग्राम सोडा टाटाचा
१०० ग्राम मीठ
१२५ग्राम लिंबू फुल

कृती

पहिले चणाडाळ, उडीदडाळ, तांदूळ घरघंटीवर 4 नंबरच्या चाळण लावून दळून घ्यावे. नंतर साखर मिक्सरला दळून घ्यावी. ती बाजूला काढून नंतर लिंबूफुल मिक्सर ला बारीक करून घ्यावे.
आता पीठ थंड झाले की त्यात पिठीसाखर आणि सोडा आणि मीठ एकत्र करून घ्यावे आणि नंतर त्या पिठावर मैद्याची चाळण ठेवून लिंबूफुल पावडर घालून चाळून लगेच छान एकत्र करून घ्यावे. सर्व पीठ 2 ते 3 वेळा रव्याच्या चाळणीने चाळून घेऊन हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
   हे झाले पीठ तयार

आता तेच पीठ १ वाटी, १वाटी पाणी आणि २ चमचे तेल घेऊन चांगले फेटून घेऊन वाफवण्यास ठेवावे ते वाफवून झाले की एका वाटीत तेल घेऊन त्यावर मोहरी , हिंग, मिरची तडतडून ती फोडणी ढोकाळ्यावर घालावी. आणि त्यावर थोडे आवडत असल्यास ओले खोबरे आणि कोथिंबीरीने सजवून कापून खावेत.
खूप छान स्पंज सारखे होतात.

अभिलाषा अमोल शिंपी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

ढोकळा

एका भांड्यात दोन वाट्या हरबरे डाळीचे पीठ घेणे...त्यात एक चमचा सोडा घालावा मीठ चवी प्रमाणे घालावे हीरवी मीरची आले लसुण पेस्ट घालावी आवडी प्रमाणे....आता एका वाटीत सारवर एक चमचा व पावडर व  नींबु सत्व एक चमचा घालुन पाव वाटी पाण्यात वीरघळणे आता पीठात बेकींग पावडर सव्वा चमचा घालणे पाणी घालुन भजीच्या पीठासाररवे कालवणे...हासताला हलके वाटते...मग वाटीतले पाणी नीबुंसत्व व सारवर चे पाणी पीठात घालावे व मीक्स करुन  रवुप हलके होते पीठ.लगेच ढोकळा पात्रात वाफवुन घ्यायचे....१५/२० मिनीट वाफवायला लागतात....थंड झाल्यावर वड्या कापाव्यात...फोडणी..तेल पाव वाटी गरम करणे...मोहरी ..जीरे...तीळ एकएक चमचा  घालणे...हींग थोडा वासासाठी घालणे.....थोडे लींबु पीळणे..पाव वाटी फोडणीत पाणी घालणे व एक चमचा सारवर घालावे एक उकळी आल्यावर  ढोकळ्यावर ओतावे अरवंड मीरची.तेलात परतवुन शीजलेकी...काढुन मीठ लावुन ढोकळ्यावर डेकोरेशन कोथींबीर.. रवोबरे घालावे...स्पंजी होतो बाजारा साररवा......🙏     
अससाच रवाचा होतो पण त्यात सोडा वबेकींग पावडरच्या एवजी इनो एक पाऊच घालावे.....

सौ.संध्या इंगळे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

ढोकळा

साहित्य

— एकवाटी बेसनपीठ, तीन चमचे रवा, मीठ ,एक चमचा साखर, एक वाटी आंबट ताक, हळद , मूठभर धने. इनो एक सॅशे

कृती—

आंबट ताकात बेसनपीठ, रवा, चवीपुरतेमीठ, साखर,हळद वधने हातावर चुरगळुन घालावेत गरज वाटल्यास थोडे पाणी घालून मिश्रण सरसरीत भिजवून दहा मिनिटे ठेवून द्यावे. कढईत पेलाभर पाणी ऊकळायला ठेवावे. थाळ्याला तेलाचा हात फिरवून घ्यावा.पाण्याला ऊकळी आल्यावर मिश्रणात एक चमचा इनो व दोन चमचे गरम पाणी घालून मिश्रण एकाच दिशेने हलवावे. मिश्रण हलके होईल .लगेच कढईतील पाण्यात एक स्टॅण्ड ठेऊन त्यावर थाळी ठेऊन झाकण ठेवावे. दहा मिनिटे मिश्रण वाफवल्यावर सुरी खूपसून पहावी. सुरीला मिश्रण चिकटले नाही तर ढोकळा तयार झाला.छान  जाळीदार ढोकळा तयार होतो. वर तेल मोहरी हळद हिंग कढीपत्ता व तीळ यांची खमंग फोडणी घालावी. वर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

मंगला डोंगरे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment