Thursday, April 5, 2018

गोड पदार्थ

गोड पदार्थ

साखर भात

साहित्य:

एक वाटी बासमती तांदूळ, दीड वाटी साखर, ३-४ चमचे साजूक तूप, ५ लवंगा, काजू बदाम बेदाणे आवडी नुसार, कणभर मीठ

कृती:

प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून निथळत ठेवावे गॅस वर छोटा कुकर गरम करत ठेवावा. त्यात 3 चमचे तूप गरम करत ठेवावे तूप गरम झाले की त्यात लवंग घालावी ती फुटली की तांदूळ घालून हळुवार परतून घ्यावे तांदूळ तुटणार नाही याची काळजी घ्यावी तोपर्यंत दुसऱ्या गॅस वर अडीज वाटी पाणी गरम करत ठेवावे तांदूळ तांबूस रंगाचे झाले की कडकडीत उकळलेलं पाणी घालावं एक उकळी आली की साखर घाला सुखमेवा बारीक काप करून घाला खायचा पिवळा अथवा केशरी रंग थेंबभर पाण्यात मिक्स करून घाला किंवा केशर असेल तर ते दुधात भिजवून घाला मीठ घाला कणभर नीट ढवळून कुकर ला झाकण लावा रोजच्या सारख्या तीन शिट्ट्या करा गॅस बंद करा कुकर ची वाफ जिरल्यावर झाकण उघडून आधी साखर भाताचा सुगंध पोटात उरात भरून घ्या आणि मग खायला घ्या

रश्मी काजरेकर-पाताडे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment