Sunday, April 8, 2018

इडली चिल्ली

इडली चिल्ली

कधी कधी आमच्या घरी इडलीच्या राशी उरतात. मग एवढ्या इडल्या का केल्यास? तू एवढं रवणाचं आंबोण का भिजवलंस? असल्या गोष्टींवरून फालतू वाद सुरू होतात. मग वळणं घेत गाडी, आता ह्याचं काय करायचं ह्या थांब्यावर येते. माझी कन्यका ह्यात हस्तक्षेप करीत म्हणते, "आई तू आणि बाबा का चिल्ले?" आणि मग, बाबांची बत्ती पेटते. तो म्हणतो, " आम्ही नाही चिल्ले, पण इडली चिल्ली!" मग तो इडली चिल्ली करतो.
तर ही रेसिपी मी मोहनच्या वतीने टाकत आहे.

साहित्य:

चिंग ची शेजवान चटणी
कांदा, ढब्बू मिरची, हिरवी मिरची, व्हिनेगर, सोया सॉस, लाल तिखट, मीठ, साखर, तेल, आलं, लसूण

कृती:

फ्राय पॅन मध्ये तेल तापवून, आंच मोठीच ठेवून त्यात लसूण, आलं, ढब्बू मिरची, गाजर, कोबी, फुलकोबी,  (ज्या असतील त्या) भाज्या आणि कांदा चूर्रर्र.  तळून ( stirr fry) घ्यावा. त्यांत चवीनुसार व्हिनेगर, सोया सॉस घालावा. चिंग चटणी घालून भाज्या अर्धवट मऊ आणि थोड्या करकरीत अश्या शिजल्या की इडलीच्या तुकडे परतून घ्यावे. अधिक तिखट आवडत असेल तर लाल तिखट टाका. कांदा पात भुरभुरून सजवावे.

मस्तपैकी इडली चिल्ली तयार.

दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment