दुधखीर
साहित्य
तांदूळ,दुध,साखर,
वेलदोडे,जायफळ,काजू,बदाम.
कृती:-
मूठभर तांदूळ दोन तास भिजत घालावे.दुधाच्या चार पाच उकळ्या काढाव्यात.उकळ्या काढताना सतत दुध हलवत रहावे.तांदूळ पाणी काढून मिक्सरमधून बारीक धाटून पेस्ट करावी.तांदळाच्या पेस्ट मध्ये अर्धीवाटी पाणी घालावे व हळूहळू उकळत्या दुधात ओतावे. तांदळाची पेस्ट घालताना दुध हलवत रहावे.(नाहीतर तांदळाच्या पिठाच्या गाठी बनू शकतात).गॅस मंद करून त्यात साखर ,वेलदोडे पूड व आवडत असल्यास काजू बदाम काप घालावेत.गरम पेक्षा फ्रीजमध्ये थंड केलेली दुधखीर चवीला छान लागते.
सौ.वैशाली पाटील
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
[25/3, 10:13 PM] अन्नपूर्णा: तांदूळ खीर
तांदूळ धुउन् घेणे
थोड्या तुपावर भाजुन घेणे
मिक्सरला लावणे रवाळ काढणे
परत थोड्या तुपावर परतुं गरम पाणी घालून शिजौन घेणे पातळ च करणे गूळ घालणे नंतर दूध घालणे वेलची पावडर घालणे
दूध घातल्यावर सतत चमच्याने हलवत रहाणे
ममता संसारे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
दूध आटवून साखर घालून ढवलायच त्यात थोड़ी दुधाची पावडर घालायची (Nestle)नंतर आपल्याला हवा असेल त्या फलांचा रस घालून मिक्सवर काढून फ्रिंज मध्ये सेट करायला ठेवायचे नंतर दोन तीन तासानंतर बाहेर काढून मिक्सर वर काढायचे परत फ्रिज मध्ये ठेवायचे दोन तासानंतर आईस्क्रीम तयार
निरस दूध घेउन याप्रमाणे करता येते
ज्योती खांबेटे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment