साबुदाणा आवडत नाही.. असे खूपच कमी लोक आहेत... साबुदाण्याची खिचडी ,सालपापड्या..साबुदाण्याचे लाडू आणि बरंच काही...
पण साबुदाणा पचायला जड वगैरे असतो..असं काहीसं सतत कानावर येत असतं..
तरीही आम्ही साबुदाणा आणतोच..मग खिचडी गार चांगली झाल्यावर लागत नाही हा युक्तिवाद करून साबुदाणा वडे करायचे असा हट्ट होतो..
पण इकडची स्वारी थोडी जास्तच "हेल्थ कॉन्शस"
तळलेले..वर्ज्य
मग साबुदाण्याचे आप्पे..हा सुवर्णमध्य सापडला असाच कुठेतरी वाचलं या पाककृती बद्दल.. आणि आता अधूनमधून आम्ही बिनधास्त आवडीनं खातो...
आज हीच पाककृती फोटोंसह तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटली.
साबुदाण्याचे आप्पे
साहित्य :
भिजवलेला साबुदाणा,
शेंगदाणा कूट,
अगदी थोडी वरी भिजवून वाटलेली, उकडलेले बटाटे .
वाटलेली हिरवी मिरची, जिरं, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर .
कृती :
सोप्पंय...
सगळं साहित्य एकजीव करून घ्या.
आप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तेल घालावे.. जेणेकरून आप्पे चिकटत नाहीत.वरील मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून पात्रात मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे..
मसाला दह्यासोबत एकदम चटकदार लागतात..
सविता करंजकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment