मिश्र डाळींचे वडे
साहित्य
अर्धी वाटी चणा (हरभरा) डाळ,
पाव वाटी मूग डाळ,
पाव वाटी उडीद डाळ,
चवीनुसार मीठ,
चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा,
अर्धा चमचा किसलेले आले,
चिमूटभर हिंग,
एक वाटी मलाईचे दही,
अर्धा चमचा चाट मसाला.
आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल
पाककृती
अगोदर हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुऊन २ तास भिजत घालाव्यात, त्यात चवीनुसार मीठ, कीससलेले आले, हिरव्या मिरच्यांचा ठेचा व चिमूटभर हिंग घालून सरबरीत वाटून घ्यावे .
वाटणाची फार बारीक पेस्ट करू नये, तेल कडक तापवून चमच्याने गोळे टाकत खरपूस हलके तपकिरी रंगावर वडे तळावेत.
दही थोडे फेटून त्यात चवीनुसार मीठ आणि चाट मसाला कालवावा, व त्यासोबत गरम वडे सर्व्ह करावेत.
प्रिया कणसे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
डाळीचे धिरडे
साहित्य
२ वाट्या बेसन,
१चहाचा चमचा मिरची पावडर,
१ कांदा बारिक चिरुन,
चिमूटभर हळद हिंग,
अर्धा चहाचा चमचा जीरे पावडर,
मीठ चवीनुसार,
१चमचा तेलाचे मोहन,
कोथिंबीर बारिक चिरलेली
कृती
वरील सर्व साहित्य एकत्र करुन त्यात पाणी घालून ईडलीपीठापेक्षा थोडे पातळ करावे, १चहाचा चमचा तेल तापलेल्या तव्यावर घालून त्यावर डावाने हे पीठ आतून बाहेर असे गोलाकार घालत जावे, झाकण ठेवून एक वाफ काढावी, उलथण्याने उलटून दुसरी बाजूही खमंग शेकावी, गरमागरम खाण्यास द्यावे. सोबत कोणतीही चटणी, साॅस अथवा दही छानच लागते.
दीपाली प्रसाद
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
तांदळाचे धीरडे
साहित्य
तांदूळ पीठ येक वाटी,
काकडी किस अर्धी वाटी,
दोन मिरच्या बारीक चिरून,
कोथिम्बिर,मीठ
बेसन दोन चमचे,
तेल १ चमचा
कृती
सर्व येकत्र करून स्रसरीत पीठ भिजून पळीने पीठ घालावे .हाताला पाणी लाऊन धीरडे गोल पसारावे.लसूण चटणी बरोबर गरम धीरडे छान लागते
वैशाली मोजरकर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मावळी काकडीचे गोड धिरडे
साहित्य-:
मावळी काकडी ( किसून) १ वाटी
गूळ ( जितकं गोड हवं त्याप्रमाणे)
तांदूळ पिठी १ १/२ वाटी
बारीक रवा २ टेबल स्पून
वेलची पूड (ऐच्छिक)
कृती-:
मावळी काकडी किसून गूळ घालून ठेवा. थोडं पाणी सुटेल त्यात मावेल इतकी तांदूळ पिठी, बारीक रवा आणि वेलची पूड घाला.
नॉनस्टिक पॅन वर धिरडी घालून थोड्या तुपावर भाजा.
अमृता बोकील
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सालाची हिरव्या मुगाच्या डाळीचे धिरडे - चिला
२ वाट्या सालाची मुगाची डाळ साधारण ४ ते ५ तास भिजवावी. नंतर ७ / ८ लसूण पाकळ्या २/३ हिरव्या मिरच्या , चवीनुसार मीठ
कृती
भिजवलेली डाळ, लसूण आणि मिरच्या मिक्सर मधून बारीक करून घ्या. नंतर चवीनुसार मीठ घालावे. नंतर धिरडी करावी. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खायला द्या
वृषाली देशपांडे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment