केक
अंड्यांचा केक
साहित्य -
४ अंडी,
१ चमचा सोडा.
१ आणि अर्धा चमचा बेकिंगसोडा
दिड वाटी तेल
२ वाटी साखर
अर्धी वाटी दूध
२वाटी मैद्याच्या चाळणीतून चाळून घेतलेले गव्हाचे पीठ किंवा मैदा
कृती-
गव्हाचे पीठ किंवा मैदा +सोडा+ बेकिंग सोडा हे तीनदा चाळून घेणे.
दुस-या भांड्यात तेल+अंडी+साखर+दूध फेटून घेणे
त्यांत नंतर वरील सर्व पीठ हळूहळू गाठी न होता मिळसने
शेवटी व्हॅनिला घालून हे
पीठ लावलेल्या भांड्यात घालून हलकेच आपटणे हवा निघून जावून केक छान होतो.
वैशाली वेटाळे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
केक
साहित्य
१ वाटी मैदा
१वाटी पिठीसाखर
१वाटी अंडी / मिल्कमेड
१वाटी तूप / बटर
१चमचा vainila इसेन्स
१चमचा बेकिंग पावडर
कृती
प्रथम मैदा आणि सोडा ३ वेळा चाळून घ्यावा.
नंतर एका भांड्यात तूप व अंड एकत्र करून चांगले फेटून घेऊन त्यात तूप घालून पुन्हा फेटावे आणि नंतर त्यात इसेन्स घालून फेटून घ्यावे आणि तो चाळलेला मैदा आणि सोडा थोडा थोडा टाकून फेटून घेऊन मिश्रण केकच्या भांड्यात ओतून बेक करून घ्यावे
कुकरला पण २० ते २५ मिनिटांत होतो आणि ओव्हनला १८0 % ला १५ ते २० मिनिटांत होतो
अभिलाषा अमोल शिंपी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment