मटार टाकोज
साहित्य
मका दाणे ,मटार
खोबर, कोथींबीर,मिरची वाटलेली
मीठ,लिंबू रस, तेल,मैदा तांदूळ पीठ, चिस, sauce
कृती
मका मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी त्या पेस्ट मध्ये मावेल इतकं मैदा व थोडीशी तांदूळ पीठ थोडं मोहन ओवा हे सगळं मळून घट्ट भिजवावं १५ मिनिटानंतर छोटी पुरी लाटून तेलात टाकावी व टाकल्यानंतर झाऱ्या च्या साहाय्याने अर्धवट दुमडावि मग छान मंद आचेवर तळून घ्यावी हे टाकोज तयार
त्यातील सारण मटार च करावं ते पुढील प्रमाणे
मटार वाफवून घ्यावेत मग अर्धवट वाटून घ्यावे त्यात वाटलेली मिरची ओल खोबर लिंबू रस मीठ कोथिंबीर हे सर्व घालून एकत्र करावे व हे सारंण या टाकोज मध्ये भराव वरून हॉट न स्वीट sauce टाकावा व चिस घालावं
प्रज्ञा विनोद
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment