Thursday, April 5, 2018

माझी आईसक्रीम ची पाककृती

माझी आईसक्रीम ची पाककृती

१ वाटी दूध, १ वाटी फ्रेश क्रीम, १ वाटी साखर, १ वाटी मिल्क पावडर, १ वाटी फ्रेश फ्रुट पल्प, सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सर मध्ये एकजीव करून घ्यावे आणि एअर टायट कंटेनर मध्ये सेट होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे.

समता कोळवणकर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

केळ्याचे आईस्क्रीम

३ केळी
१ टेबल स्पून पीनट बटर
दीड टेबलस्पून चोकलेट चीपस्
कृती
केळी सोलून पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी. १ तासाने बाहेर काढून मिक्सरमध्ये
बारीक करावे. मिश्रण एअर टाईट कंटेनर मध्ये ट
काढावे. नंतर त्यात पीनट बटर टाकून मिक्स करावे. चोकलेट चीपस् टाकून परत एकदा मिक्स करावे. कंटेनर ला झाकण लावून फ्रीजमध्ये  सेट करा

वृषाली देशपांडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

माझी आईसक्रीम ची रेसिपी: १ वाटी दूध, १ वाटी फ्रेश क्रीम, १ वाटी साखर, १ वाटी मिल्क पावडर, १ वाटी फ्रेश फ्रुट पल्प, सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सर मध्ये एकजीव करून घ्यावे आणि एअर टायट कंटेनर मध्ये सेट होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे.

१ वाटी फळांचा गर ( चिक्कू, आंबा, सीताफळ वगैरे)
१वाटी दूध
१ वाटी क्रीम
१ वाटी दूध पावडर
१ वाटी साखर
सर्व मिक्सरवर एकत्र करून घ्यावे आणि फ्रीझरमध्ये सेट करायला बंद डब्यात ठेवणे.

ममता संसारे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment