Thursday, April 5, 2018

आंब्याची डाळ

आंब्याची डाळ

डाळ ४ तास भिजत ठेवणे नंतर चाळणीत निथळत ठेवणे  व मग जाडसर वाटणे त्यात फोडणी करून टाकणे ओल खोबरे कोथींबीर कैरीचा किस मीठ चवीला साखर घालणे खमंग पणाला फोडणीत थोडं तिखट  नि डाळ वाटताना मिरची व थोडं जिर घालणे हे सर्व साहित्य व्यवस्थित कालवणे

प्रज्ञा
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

आंबा डाळ

साहित्य –

२ वाट्या हरभरा डाळ (३-४ तास भिजवा), २ कै-या (किसून घ्या), २-३ कमी तिखट हिरव्या मिरच्या, १-२ टीस्पून साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
फोडणीसाठी – २ टेबलस्पून तेल, मोहरी, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, ७-८ सुक्या लाल मिरच्या बारीक तुकडे केलेल्या

कृती –

१) भिजवलेली चणा डाळ चाळणीत घालून निथळून घ्या.
२) डाळ मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात हिरव्या मिरच्या तुकडे करून घाला.
३) डाळ मिक्सरला जाडसर वाटून घ्या. वाटताना वाटलं तर किंचित पाणी घाला म्हणजे डाळ अगदी कोरडी होणार नाही.
४) वाटलेली डाळ एका भांड्यात काढा. त्यात कैरीचा कीस, साखर, मीठ, कोथिंबीर घाला. नीट कालवून घ्या.
५) एका लहान कढईत तेल तापवा. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी घाला.
६) मोहरी तडतडली की मिरच्या घाला. लगेचच हिंग, हळद घाला.
७) ही फोडणी आंबा डाळीवर घाला. खाताना फोडणी कालवून मग खा.
आंबा डाळ तयार आहे.
कैरीचा आंबटपणा कसा आहे ते बघून कैरीचं प्रमाण कमी-जास्त करा. साखर आवडीनुसार वापरा.ओलं खोबरं असल्यास घाला.

रश्मी काजरेकर-पाताडे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment