मसाला वडा
साहित्य
हरभरा डाळ १ वाटी,बारीक चिरलेला कांदा १वाटी,५पाकळ्या लसूण, १इंच आले, ४-५मिरे, १/२चमचा जिरे, बारीक चिरलेला शेपू १ ते १/२ वाटी, २ काड्या कढीपत्ता, ५-६ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ वाटी, १/४ वाटी पुदीन्याची पाने,हळद १/२ चमचा, सुक्की , चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती
•प्रथम हरभरा डाळ २तास भिजत घालावी. •नंतर त्यातले पाणी निथळून काढावे. •भिजलेली थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवावी.
•राहिलेली डाळ पाणी न घालता सरबरीत वाटून घ्यावी.
•यामध्ये आलं, लसूण, मिरची, मिरे
आणि जिरे यांचे वाटण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला शेपू ,बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदीन्याची पाने, कढीपत्त्याची पाने, हळद, मीठ हे सर्व चांगले एकत्र करावे. I
•या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करावेत. बाजूला काढून ठेवलेली भिजवलेली डाळ थोडी हातावर घेऊन त्यावर गोळे चपटे करून घ्यावेत.
•एका कढईमधे तेल तापवून त्यामध्ये हे चपटे केलेले गोळे एक एक करून सोडावेत व मंद आचेवर तळावेत.
•पुदीना चटणी बरोबर मस्त लागते.
डॉ. अस्मिता भस्मे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment