एक वेगळी भोपळीची टोपली
साहित्य
छोट्या भोपळी मिरच्या,
चणा पीठ
कांदा,टोमॅटो,
घरातील उरलेल्या भाज्या,कॉर्न
तिखट,जिरेपावडर, चाट मसाला,हळद
कृती
भोपळी मिरची वरील देठाचा भाग देठ ठेवून गोल कापून घ्यावा. आतील बिया काढून टाकाव्या.
कांदा,टोमॅटो, तिखट,हळद,जिरेपूड,चॅट मसाला,इतर भाज्या,मीठ सर्व एकत्र सुकी भाजी करून घ्यावी.
ही भाजी भोपळी मिरचीत भरावी आणि वरचे झाकणाचे आवरण लावून टाकावे.भजी ला वापरू एवढे चनापीठ भिजवून त्यात ही टोपली बुडवून संपूर्ण भाजी सारखी तळून घ्यावी..
मृणाल पाटोळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment