बटाट्याचे काप
•लाल मिरची पावडर, लसूण,चिंच,हळद व मीठ एकत्र वाटून (कमी पाणी घालून)मसाला तयार करून फ्रीझर मध्ये ठेवावा. बरेच दिवस टिकतो.
• बटाट्याचे काप करून त्याला हा मसाला लावून थोडे तांदुळाचे पीठ घालावे.
•शॅलो फ्राय करताना रवा+थोडे तांदुळाचे पीठ+मीठ+तिखट+हळद घालून मिक्स करून काप त्यात घोळवून तव्यावर शॅलो फ्राय करावेत.
•हाच मसाला वापरून, कच्ची केळी, सुरण,वांगी,अक्खी भेंडी,शेवग्याच्या शेंगा (जाड्या)यांचेही काप करता येतात.
रीमा मंकीकर
धन्यवाद !
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment