चॉकलेट कूकी आईस्क्रीम
हल्ली घरी नको त्या गोष्टींत स्वावलंबीपणा वाढलाय हो आमचा...
त्यामुळे चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टींची प्रित्यंतर मिळताहेत.
काल नचिच्या रूममधे छान ऊन होतं म्हणून माझा बाडबिस्तरा तिकडे हलवला, एकदा डेस्क पायावर घेतलं अन् कामाला सुरुवात केली कि उठायची इच्छा होत नाही.
एकदा दूध बिस्किट ची मागणी आली, देते म्हणत २-३ मिनिटे तसंच काम चालू होत, मग उत्तर आलं मी घेतो माझं माझं.. तसंही तोच घेतो.पण माझ्या हजेरीत... आजही तसेच होईलस वाटले.
एका डब्यात १०-१२ बिस्किटस् आणि २ कप दूध, एका साईडने खाणे सुरू होते.. काहीच बोलून उपयोग नव्हता...
जास्तीत जास्त ४ बिस्किटस् संपली होती आणि ते सगळे तसेच ठेवून आम्ही खेळायला पळालो...
५ मिनिटे तशीच त्याच्याकडे बघत बसल्यावर... डोक चालायला लागले.
•फ्रिजमध्ये एक्स्ट्रा थिक क्रिम होती, पटकन फेटून घेतली.
•४-५ चमचे साखर टाकून पुन्हा फेटले.
• दूध- बिस्कीट मिश्रणही छान मिक्स करून घेतले आणि क्रिममध्ये मिक्स केले.
• चॉकलेट चन्क्स टाकले आणि एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रिजरला ठेवले.
•एक तासाने काढून पुन्हा फेटलं आणि फ्रिजरमधे ६-७ तासांसाठी ठेवलं.
खरं खूप क्रिमी क्रिमी झालं आईस्क्रीम...!!!
आणि ट्राय करायचे होते 'चॉकलेट कुकी आईस्क्रीम'.नचिकेतने योग लवकरच आणला..
खरंच !! थँक्स नचिकेत..
जयश्री खराडे.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment