Thursday, September 6, 2018

ताहिनी पेस्ट (तीळ पेस्ट)

ताहिनी पेस्ट (तीळ पेस्ट)

ताहिनी पेस्ट/सॉस हे वेगवेगळया सलाड मधे ड्रेसिंग म्हणून आणि बऱ्याचशा डिपस् मधेही वापरतात. तीळाच्या पौष्टिक तत्त्वांमुळे ही पेस्ट खूप प्रसिध्द आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूपच सोपी आणि कमी वेळात होणारी..

• तीळ तव्यावर कुरकुरीत भाजून घ्यावेत.
• मिक्सरमधे आधी तीळ घालून छान तेल सुटेपर्यंत बारीक करावे, फाईन पेस्ट होण्यासाठी २-३ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे.अगदी मऊ पेस्ट तयार होईल.
• चवीपुरते मीठ घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
हवाबंद डब्यामध्ये काढून फ्रिजमधे छान साठवता येते.

इझी-पिझी ताहिनी पेस्ट रेडी...

हम्मस्

साहित्य

५-६ तास भिजलेले छोले(चिकपीज), ताहिनी पेस्ट, बारीक कापलेला लसूण, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, मिरेपूड, लिंबूरस, ऑलिव्ह ऑइल,मीठ.

कृती

• मिक्सर/फुड प्रोसेसरमधे ताहिनी पेस्ट आणि लिंबूरस घालून छान मिक्स करून घ्यावे, यामुळे हम्मस् क्रिमी बनते.
• आता भिजलेले काबुली चणे,लसूण,मीठ, जिरे-मिरेपूड घालावी आणि पेस्ट बनवावी.
• छान पेस्ट होण्यासाठी ऑलिव्ह ऑईल घालावे.
• हम्मस तय्यार...

डीप म्हणून, स्प्रेड म्हणून कसेही वापरा..

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment