Thursday, September 6, 2018

आणखी एक सौम्य चवीचे विरुद्धाशन

आणखी एक सौम्य चवीचे विरुद्धाशन

कोबी/फ्लॉवर/दुधी/लाल भोपळा/मशरूम यांची दुधातील सुपे

१. एका भांड्यात चिरलेला कोबी, लसणाच्या दोन तीन पाकळ्या, कोथिंबिरीच्या काड्यांचे चिरून तुकडे, एक हिरवी मिरची कमीत कमी पाण्यात उकडून घ्या.
२. उकडलेल्या भाज्या गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३. एका भांड्यात दूध घेऊन त्यात हे वाटण टाका.
४. मिश्रणात चवीनुसार मीठ टाका. आवडत असल्यास मीरपूड टाका. गॅसवर ठेवून उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.

सूप सर्व्ह करण्यासाठी तयार!
लाल भोपळा/मशरूम/कोबी/फ्लॉवर यांची सुपे अशाच रीतीने तयार करता येतील.

डॉ.वसंत काळपांडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment