डिंक ,ड्राय फ्रूट लाडू
साहित्य
सुकं खोबरे, खारीक प्रत्येकी १/२किलोग्रॅम
खायचा डिंक १०० ग्रॅम, बदाम ,पिस्ता, काजू प्रत्येकी १५० ग्रॅम, तूप ,वेलची पावडर १ चमचा
कृतीः
१.प्रथम डिंक निवडून तुपात तळून घ्यावा .२.नंतर खोबरे किस, खारिक बारिक पूड करुन घ्यावी.
३. पिस्ता ,काजू,बदाम यांची जाडसर पूड करुन घ्यावी.
४.खोबरे किस, खारीक पूड तूपात भाजून घ्यावी.
५.सर्व एकत्र मिसळावे.
६.वरील साहित्याला साधारण १/२कि गूळ बारीक करून घ्यावा.
७.नंतर जाड बुडाच्या कढई त थोडे तूप टाकून गूळ विरघळून घ्यावा .
८.वरील साहित्य त्यात टाकून वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावे.
९.तळलेला डिंक बारीक करून घालावा .
१०.आता लाडू वळताना गरम असताना वळावे अन्यथा लवकर वळले जात नाहीत.
*हवे तर वरून तूप घालू शकता.तूप जास्त लागते.
हे लाडू खूपच पौष्टिक आहेत आणि खायला तर अहाहा ....!!
डॉ.संध्या झाडे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment