बदाम कुकीज
मैदा १२० ग्रॅम
बटर ८०ग्रॅम
कॅस्टर शुगर ८०ग्रॅम
बेकिंग पावडर 1१चहाचा चमचा
दूध अर्धा चहाचा चमचा
बदाम इसेन्स् १ चहाचा चमचा
वरुन सजवायला बदाम काप.
१.प्रथम बटर आणि शुगर चांगले फेटून घ्यावे. २.त्यात दूध मिसळून फेटावे,
३.आता त्यात मैदा, इसेन्स्, बेकिंग पावडर मिसळून फेटावे.
४.कुकीजचे आकार देऊन वरुन बदामाने सजवावे, बेक करुन थंड करावे व आस्वाद घ्यावा.
◆व्हनिला कुकिज्
वरील कृतीत बदाम इसेन्स्ऐवजी व्हनिला इसेन्स् वापरावे. सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स्, टुटीफ्रूटी, चॉकोलेटचे तुकडे असे वापरु शकतो आवडीप्रमाणे..
◆चोको कुकीज
वरील कृतीत बदाम इसेन्स् ऐवजी व्हॅनिला
इसेन्स् व चोकोलेट सिरप २ते ५चहाचे चमचे आवडीनुसार वापरावे, (सौम्य किंवा तीव्र)
◆ काॅफी कुकीजवरील कृतीत बदाम इसेन्स् ऐवजी दुधात इन्स्टंट काॅफी २ ते ५चहाचे चमचे आवडीनुसार वापरावे, (सौम्य किंवा तीव्र).
वरील प्रमाणात कोको वापरुन कुकीज बनवू शकतो.
◆तसेच काॅफी कोको ही एकत्रित फ्लेवर बनवू शकतो.
दीपाली प्रसाद
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment