कारळे कडीपत्ता चटणी
साहित्य व कृती
भाजलेले तीळ-अर्धा वाटी,
कारळे-अर्धा वाटी
अर्धा वाटी कडीपत्ता,
सुकी लाल मिरची - ५-६
२ टेबलस्पून तेल,
मीठ , हवे असेल तर लसूण.
मिरची, कडीपत्ता, तेलात परतून घ्यावे. आणि सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढून घेऊन चटणी करावी.
डाळे कडीपत्ता चटणी
साहित्य
अर्धा वाटी डाळे, लसूण अर्धा वाटी कडीपत्ता, ३चमचे तिखट, मीठ लिंबू रस, साखर,
२ टेबलस्पून तेल.
कृती
•तेलात कडीपत्ता, लसूण, तळून घ्या.
• लिंबूरस तेलात घाला. कड कड आवाज आला की डाळे घाला.तिखट घाला आणि परता.
•मग सगळे पदार्थ एकत्र करून बारीक करून घ्या.
•चटणी दह्यामध्ये घालून पण छान लागते.
अंजली अतुल जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
कढीपत्त्याची चटणी
बहुतेक करून सगळेजण कढीपत्ता चटणीसाठी तळून घेतात. पण मी एक वेगळा प्रयोग करून पहायचे ठरवले.... कढीपत्ता न तळता तसाच वापरण्याचा. यामुळे कढीपत्याचा घमघमाट चटणी संपेपर्यंत तसाच राहतो. थोडीशी काळजी घेऊन केले तर १५ दिवसांपर्यंत टिकते चटणी. बेंगलोरला कढीपत्त्याच्या काड्या नव्हे तर फांदीच विकण्यासाठी ठेवतात.
सर्वप्रथम कढीपत्ता फांदी सकट बादलीमधे ३-४ वेळा पाणी बदलून खळबळून घ्यावा.नंतर काड्या काढून पिण्याच्या पाण्याने परत एकदा स्वच्छ धुऊन निथळत ठेवायचा. पूर्ण पाणी निथळल्यावर त्याची कोवळी व खराब पाने काढून टाकावीत....म्हणजे चटणी जास्त टिकते. पाने सुट्टी करून कट्ट्यावर पसरून ठेवावीत. थोड्यावेळाने जागा बदलावी म्हणजे राहीलेले पाणी गळून जाते. नंतर एक एक पान उलट सुलट कोरड्या कपड्याने पुसून घ्यावे... माझा या चटणीच्या वेळी दिवसभर हाच खेळ चालू असतो.
...नंतर पाने रात्रभर तशीच कट्ट्यावर पसरून दुसऱ्या दिवशी चटणी करते. उन्हात वाळवले/तळले की मूळ चव बदलते. मी १५-२० दिवसांची चटणी करून ठेवते. नंतर २-३ महिन्यांनी परत नंबर येतो या चटणीचा. त्यामुळे मी करते ते प्रमाण सांगते... तुम्ही सोयीनुसार करा.
साहित्य
कढीपत्ता ५०-६० काड्या
सुक्या खोबऱ्याचा किस १ वाटी
लसूण ९-१० पाकळ्या
फुटाण्याची डाळ ६ वाट्या
जिरे २ चमचे
लाल तिखट ६ चमचे
मीठ चवीनुसार .
कृती
•खोबऱ्याचा किस थोडा परतून थंड करून घ्यावा.
•वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र चांगले बारीक करून घ्यावे.
•अतिशय चविष्ट खमंग चटणी तयार.
•नंतर थोडावेळ ताटामधे पसरून पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
• माझ्या आईकडून कुठल्याही पदार्थाला लवकर शाबासकी मिळत नाही.
•पण ही चटणी तिला खूप आवडते.😎. यातच मी भरून पावते.😊
डॉ.अस्मिता भस्मे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment