🔷मशरूम बेबीकॉर्न मसाला🔷
साहित्य व कृती:
२ मोठे कांदे,२ मध्यम टोमॅटो, ६-७ काजू, १/२चमचा खसखस, ६-७ पाकळ्या लसूण, १/२" आलं हे सर्व तेलावर चांगले परतून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
मशरूम साफ करून त्याचे चार तुकडे करुन घ्यावे. १ सिमला मिरची कापून घ्यावी, बेबीकॉर्न कापून घ्यावे.
*कढई गरम करून त्यात १चमचा बटर व तेल टाकावे, गरम झाल्यावर ३काळीमिरी, ३ लवंगा, एक तमालपत्र टाकावे.
* त्यामध्ये वाटलेली कांदा टोमॅटोचे वाटण टाकून चांगले परतावे.
*त्यात तिखट, हळद घालून चांगले परतावे.नंतर चिरलेल्या भाज्या घालून परतून थोडे पाणी घालून शिजायला ठेवावे.
*शिजल्यावर मीठ, गरम मसाला पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी घालून एकत्र करुन एक वाफ काढावी.
*वरुन कोथिंबीर घाला
🔷रंगबहार सलाड
* लाल कोबी, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, कोथिंबीर,टोमॅटो हे सर्व चिरुन घ्यावे. खूप बारीक चिरू नये.
*त्यामधे पनीर कुस्करून घालणे.
*लिंबू रस व सैंधव मीठ घालून सर्व एकत्र करावे.
*तयार ड्रेसिंग मिळतं, ते घातले तरी छान लागतं.
वंदना मंकीकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment