Monday, September 3, 2018

दुधीचे मुठिया

दुधीचे मुठिया

साहित्य:

दुधी कोवळा किसलेला, मिक्स पिठं/भाजणीचे पिठ, तिखट, हळद, मीठ, धणे जीर पावडर, तेल, राई, तिळ, कोथिंबीर, ओलं खोबरं

कृती:

दुधीच्या किसात तिखट, हळद, धणे जीरे पावडर,२ चमचे तेल, मीठ घालून त्यामध्ये मावेल;एवढं पीठ घालून मळून घ्यावे.
*पाणी घालावे लागत नाही.
*लांब सुरळ्या करुन चाळीत ठेवून वाफवून घ्यावे.
*व्यवस्थित उकडल्यावर थंड झाल्यावर कापून चकत्या करून घ्याव्या.
*कढईत तेल गरम करुन त्यात राई, तीळ व हिंग टाकून फोडणी करावी.
* त्यामध्ये कापलेले मुठिया चे काप टाकून परतून घेणे.
*खोबरं ,कोथिंबीर घालून गरम गरम खायला देणे.
* मी त्यामध्ये 'चिंग' चा मसाला वरुन घालते त्यामुळे चटकदार लागते.

वंदना मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment