कितवे आश्चर्य म्हणू ...शेपू सोहळा!!
अतिशय सुगंधी ,चवदार ,पोटाचा निचरा करणारी ,सर्वत्र कमी किमतीत उपलब्ध अ जीवनसत्वाची राणी....शेपू
चांगली ताजी कोवळी टसकी ( कमी उंचीची )पेंढी आणा निवडा किंवा बुडखे कापून दोन पाण्याने धुवून घ्या .
मधल्या वेळेत चना मूग मटकी किंवा तूर यापैकी कोणतीही डाळ भिजत घाला .
आता शेपू भाजी सावधगिरीने विळीवर चिरून घ्या .कढई हवाई चुलीवर (गॅस) ठेवण्यापूर्वी भरपूर लसूण ,हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपल्याला सहन होतील असे प्रमाणात घ्या.
कढईत तेल टाका.गरम झाले की जिरे मोहरी व लसूण व मिरच्यांचे तुकडे (ठेच्यापेक्षा तुकड्यांनी चव वाढते )टाकून चांगले ठसकेबाज परतून घ्या .
आता चिरलेली भाजी कढईत टाकून भिजलेली डाळ, शेपूवर टाकून उलथण्याने सर्व साहित्य एकत्र करा .मीठ टाकून झाकण ठेवा. जाता येता खाली वर करा. मिठाच्या पाण्यावर शिजवून घ्या .
तुम्हाला शेंगदाणे कूट टाकायचे असेल तर भरड फुटीचा कूटही टाकू शकता .पण ही भाजी चांगली शिजवून घ्या. सुकीच चपाती ,भाकरी बरोबर खा .पुन्हा आणून खाण्याची इच्छा होईल.
आठवड्यात दररोज नाही तरी तीनचार वेळा हिरवा आहार शाकाहारी च नव्हे तर मांसाहारी मंडळींनी घ्यावा .फास्ट फूड फास्ट आरोग्य मूड घालवते .ही हॉटेलमध्ये न मिळणारी भाजी.मिळतही असेल पण घरची चव ती चवच ..
मला वाटतं आपण हा शेपू सोहळा घरच्या घरी सर्वांनी सहभोजनाने साजरा करावा .अतिशय कमी बजेटमध्ये बोनांझा आनंद !!
काकासाहेब वाळुंजकर
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment