पॅटीस/चीज पॅटीस
१.बटाट्याची भाजी करतो तशी करावी फक्त २.यात बटाटा भाजी पूर्ण बारीक स्मॅश करून घ्यावी.
३.सँडविच ब्रेड मिळतात ते फ्रेश आणावा.
तयार भाजी ब्रेड ला लावून त्यावर चीजचे एक स्लाईस ठेवून दुसरा ब्रेड चा तुकडा ठेवावा, आणि नंतर त्याचे त्रिकोणी चार काप करून घ्यावे.(आवडीनुसार नाहीतर दोन्ही चालतात)
बेसन आवरण
१.यात गरजेनुसार म्हणजे किती साधारण पॅटीस बनवतो, त्यावर,किती बेसन पीठ घ्यायचं ते घ्यावे.
२. त्यात चवीपुरतं मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा, हळद आणि मी यात एक्स्ट्रा पिझ्झा मसाला होता तो घेतला १ चमचा घालावे.
३.तयार मिश्रणात पाणी घालून ते प्रमाण थोडं पातळसर ठेवावे.(हवे असल्यास घट्ट ठेवू शकता)
४.पॅन मध्ये तेल गरम करण्यास ठेवावे आणि तयार ब्रेड तुकडे बेसन मिश्रणात घोळून तळून घ्यावे, गरम गरम पॅटीस तयार !!😊
पुदिना चटणी:
मूठभर पुदिना, तेवढीच कोथिंबीर, अर्धा लिंबू रस, चवीपुरतं मीठ, २ ते ३ हिरव्या मिरच्या(तिखट किती हवे त्यावर) ४ पाकळ्या लसूण, आलं सर्व गोष्टी एकत्र मिक्सर ला बारीक करून पेस्ट करून घ्यावी.
पुदिना चटणी तयार 😁
रोशनी राजगुरू
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment