शेपूची पीठ पेरून भाजी
साहित्य
शेपू चिरलेला, ४वाटी अर्धा वाटी डाळीचं पीठ, ९-१० हिरवी मिरची, लसूण १०-१५पाकळ्या, मीठ, हे तिनी एकत्र वाटा, फोडणी साठी तेल.
कृती
नेहमीसारखी फोडणी करा .आणि शेपूची भाजी टाका, दोन -तीन वाफा आणून मग वाटण घाला आणि भाजी परता, मग पीठ घाला आणि मिक्स करा आणि एक वाफ द्या. भाजी तयार...
अंजली अतुल जोशी
शेपूच्या चकोल्या(फळं)
साहित्य
शेपूची जुडी,तूप,लसूण, जिरे,मोहरी,तुरीची डाळ,कणीक,पाणी, तेल ,तूप
कृती
१.शेपू निवडून ,धुऊन, चिरून घ्यावी.
२. तेलात भरपूर लसूण, जिरे, मोहरीची फोडणी करून भाजी फोडणीस टाकावी. ३.भिजवलेली तुरीची डाळ व मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी.
४.घट्ट भिजवलेल्या कणकेची पातळ पोळीालाटून चौकोनी काप कापून घेऊन भाजीवर पसरावेत.
५.पाण्याचा हबका देऊन झाकण ठेऊन दणदणीत वाफ काढावी.
६.नंतर भाजी व चकोल्या व्यवस्थित एकत्र कराव्यात.
७.भरपूर तूप सोडून गरमागरम आस्वाद घ्यावा.
मंगल डोंगरे
शेपूची भाजी (डाळ घालून)
शेपूची भाजीत मूगडाळ किंवा पंढरपूरी डाळ (फुटाणा डाळ ) किंवा तुम्हाला आवडेल ती डाळ घालावी. अर्थात ती १५ मिनिटे तरी भाजी करायच्या भिजत घालावी .
कृती
लसूण ,कांदा बारीक चिरून,(भाजीच्या अंदाजाने कांदा घालावा.) हिरव्या मिरच्या चिरून,मीठ व डाळ व शेपू निवडून बारीक चिरून ,धुऊन चाळणीत निथळत ठेवावी. फोडणीत लसूण आणि कांदा आणि डाळ घालून हिरवी मिरची चिरून व मीठ व भाजी घालून परतावे व झाकून एक वाफ द्यावी आणि (आवडत असेल तर शेंगदाणे कूट ओबडधोबड केलेला घालावा. )
सौ.सुनंदा शिंदे
शेपूची भाजी (मूगडाळ घालून)
कृती
•मूगडाळ भिजवून घेणे
•फोडणी - मोहरी, हिरवी मिरची, लसूण ठेचून , बारीक चिरलेला कांदा घालून करणे.
•मग मूगडाळ परतून घेणे.
•नंतर बारीक चिरलेली शेपू घालून परतणे.
•मग मीठ घालून वाफेवर शिजवून घेणे.
थोडं महत्त्वाचं
शेपुच्या भाजीत दुधीची कोवळी पाने बारीक चिरून घातल्यास व थोडी तांदळाची कणी घातल्यास शेपूचा उग्र वास कमी येतो.ज्यांना ढेकर येतात त्यांनी अशा पध्दतीने खा .तशीही ही वातशामक कफशामक ,अग्नीदिपक आहे म्हणून तर पावसाळ्यात येते ,निसर्ग भरभरून देतो आपण त्याचा आस्वाद घ्यायचा..
शेपूच्या भाजीबद्दल थोडं अधिक!
*शेपूच्या भाजीत दुधीची कोवळी पाने बारीक चिरून घातल्यास व थोडी तांदूळ ची कणी घातल्यास शेपूचा उग्र वास कमी येतो .
*ज्यांना ढेकर येतात त्यांनी अशा पध्दतीने खा ,तशीही ही वातशामक कफशामक ,अग्नीदिपक आहे. *म्हणून तर पावसाळ्यात येते .
निसर्ग भरभरून देतो आपण त्याचा आस्वाद घ्यायचा .
डॉ. संध्या झाडे
शेपूची आमटी
•प्रथम तुरीची डाळ शिजवून घ्यावी.
• एका भांड्यात फोडणीसाठी तेल घ्यावे.
•तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता कांदा टाकावा.
•कांदा थोडा परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर शेपू टाकावा.
• २ मिनीटे परतल्यानंतर त्यामधे शिजवलेली तुरीची डाळ गरगटून टाकावी.
•आमटीसारखी पातळपणा येईल एवढे पाणी टाकून,चवीनुसार मीठ टाकून चांगले उकळावे. •मिरची नको असेल तर लाल तिखट पण छान लागते.
डॉ. अस्मिता भस्मे
शेपूची गरगटी भाजी
•आमच्याकडे पालक जास्त व पालकच्या निम्मे शेपू व शेपूच्या निम्मा आंबट चुका ह्या भाज्या चिरून धुऊन एकत्र वाफवून घ्याव्यात.
•नंतर फोडणीचे तेल गरम झाले कि लसूण छान परतला की हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार मीठ व एकत्र शिजवून घेतलेल्या भाज्या फोडणीत घालाव्यात.
•एक चमचा (टेबल स्पून ) बेसन पीठ पाण्यात मिसळून भाजीत मिक्स करावे.थोडा गुळ घालून भाजीला चांगली वाफ द्यावी .
•झाकण ठेवावे ,ह्या भाजीला गरगटी भाजी म्हणतात.
दुसरी पध्दत
ह्यात शेंगदाणे घालतात व मुळा गोल चकती करून फोडणी करताना लसूण बरोबरच घालून परतावा. बाकी कृती वरीलप्रमाणे !!
सौ.सुनंदा शिंदे
धन्यवाद!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment