उपवासाची इडली
साहित्य
वरई तांदूळ-चार कप
हिरव्या मिरच्या ३/४
आले वाटण- अर्धा चहाचा चमचा
जिरे -चहाचा अर्धा चमचा
मीठ
तूप
खाण्याचा सोडा
कृती
•वरई निवडून आधीच चार तास भिजत ठेवा. पाणी जास्त वापरू नका.
•भिजवून ठेवलेली वरई. मिरच्यांचे तुकडे, जिरे मिक्सरमध्ये घाला.
•बारीक झाल्यावर बाहेर काढून त्यात मीठ, आले वाटण, हवे असल्यास थोडे दाण्याचे कूट टाका व कालवा.
•मग इडलीपात्र घेऊन साच्यांना तुपाचा हात चोळा, इडली पिठात थोडासा सोडा टाका. पुन्हा कालवा.
•हे मिश्रण साच्यात थोडे थोडे ओता. इडली करतो त्याप्रमाणे वाफवून घ्या.
•थोड्या दह्यात मीठ, जिरेपूड टाकून कालवून याला लावून इडल्या खा.
अंजली अतुल जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment