नारळी भात
२ वाटी तांदूळ
४ वाटी पाणी
१,१/२ वाटी गूळ
१,१/२वाटी ओलं खोबरं
८ चमचे तूप
४ लवंगा
२ अख्ख्या वेलच्या
बेदाणे, काजू तुकडे
कृती
• तांदूळ धुवून निथळून ठेवणे.
• १तासाने कुकर गरम करुन त्यामध्ये तूप टाकणे.
३.पाणी उकळायला ठेवणे.
४. तुपात लवंगा, वेलची टाकून त्यावर तांदूळ टाकून परतणे,
५. त्यामध्ये ओलं खोबरं टाकून परतणे,चांगले परतल्यावर त्यावर गरम पाणी टाकून झाकण लावण.१ शिट्टी करुन गॅस बंद करणे. ६.थोड्या वेळाने वाफ गेल्यानंतर कुकर उघडणे.
७.चिरलेला गूळ,बेदाणे, काजू तुकडे टाकून व्यवस्थित ढवळून परत झाकण लावून गॅसवर कुकर ठेऊन थोडी वाफ धरली की गॅस बंद करणे.
८.थोड्यावेळाने कुकर उघडून पहिला देवाला नैवेद्य दाखवून खायला देणे. 😊
वंदना मंकीकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷गाजर नारळ भात
साहित्य
बासमती जुने तांदूळ २ वाटी, साखर ४ वाटी, गाजर किस २ वाटी , नारळ चव २ वाटी साजूक तूप २ चमचे, लवंगा २, ३ वाट्या गरम पाणी, मीठ किंचित, सुका मेवा, वेलची पूड..
कृती -
•तांदूळ धुऊन तासभर निथळत ठेवा.
•पॅन मध्ये तूप गरम करून लवंगा टाका.
•तांदूळ पॅनमध्ये टाकून परतून घेणे .
•गरम पाणी मीठ टाकून भात मोकळा शिजवून घेणे.
•मग ताटात पसरून ठेवणे, कढईत तूप गाजर किस ,नारळ चव, साखर मिक्स करून मंद आचेवर शिजवावे.
•मिश्रण घट्ट होत आले की वेलची पूड आणि भात टाकून मिक्स करा.
• वरुन थोडे तूप काजू बदाम घालून एक वाफ द्या...
• गाजर नारळभात आहे तयार!!!
अंजली अतुल जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment