Thursday, March 22, 2018

संकलन १

*नमस्कार!*

असे म्हटले जाते की एखाद्याच्या काळजात घर करायचे असेल तर त्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो. *म्हणूनच मराठीचा ठसा सर्वांच्या काळजावर उमटविण्यासाठी आम्ही अन्नपूर्णा या समूहाची स्थापना केली.*

*मराठी जितकी वापरली जाईल तितका तिचा प्रचार आणि प्रसार होईल या मताला धरून आम्ही महाराष्ट्रभरातील विविध लोकांच्या पाककृती  आणि त्यातील पदार्थांची नावे या समूहातून संकलित करून तुमच्या पुढे सादर करीत आहोत.*

*एकूण ६० पाककृती दोन भागांत विभागून!!*

*भाग १*

♦️ *मिश्र चटणी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/1.html

♦️ *चर्चा-आजची भाजी- नवलकोल* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/193-1103-pm.html

♦️ *काजूची उसळ* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_70.html

♦️ *सोडे भात* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_89.html

♦️ *मसाले भात-लेख* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_74.html

♦️ *थालीपीठ* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_55.html

♦️ *खारी मिरची* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_42.html

♦️ *सूप* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_0.html

♦️ *फणसाची भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_83.html

♦️ *खरवस* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_8.html

♦️ *आजची भाजी-भेंडी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/5-0703-1129-am-0703-1129-am.html

♦️ *गुढीची माळ* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_56.html

♦️ *केळीच्या पाककृती* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_63.html

♦️ *बडीशोप सरबत* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_52.html

♦️ *लाटीव वड्या* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_67.html

♦️ *कटाची आमटी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_24.html

♦️ *डांगर* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_13.html

♦️ *थालीपीठ आणि गाणं* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_97.html

♦️ *सिंधी कढी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/133-939-pm-dipti-pujari-2-4-5-2-3-4-3-4.html

♦️ *दहिवडी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_23.html

♦️ *अळूची भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_87.html

♦️ *कोथिंबीर तिखट आणि पोहे* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_15.html

♦️ *कारल्याची सोप्पी भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_35.html

♦️ *लिंबाची साल* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_46.html

♦️ *हिरव्या मुगाचे डोसे- एडण्या* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_26.html

♦️ *चणा जोर* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_14.html

♦️ *इस्ट इंडियन बाटली मसाला*
http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_49.html

♦️ *पोहे-प्रकार* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_9.html

♦️ *सुरण,रताळ, शिंगाडे पीठ भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_45.html

♦️ *मसाला ताक,मठ्ठा* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_51.html

*सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
*#अन्नपूर्णा*

संकलन २

*नमस्कार!*

असे म्हटले जाते की एखाद्याच्या काळजात घर करायचे असेल तर त्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो. *म्हणूनच मराठीचा ठसा सर्वांच्या काळजावर उमटविण्यासाठी आम्ही अन्नपूर्णा या समूहाची स्थापना केली.*

*मराठी जितकी वापरली जाईल तितका तिचा प्रचार आणि प्रसार होईल या मताला धरून आम्ही महाराष्ट्रभरातील विविध लोकांच्या पाककृती  आणि त्यातील पदार्थांची नावे या समूहातून संकलित करून तुमच्या पुढे सादर करीत आहोत.*

*एकूण ६० पाककृती दोन भागांत विभागून!!*

*भाग-२*

♦️ *दही मेतकुटातल्या मिरच्या* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_21.html

♦️ *सफरचंद हलवा* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_32.html

♦️ *टोमॅटो चटणी,उकडपेंढी,ज्वारी इडली* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_57.html

♦️ *चला दही लावू!* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_86.html

♦️ *भोपळा भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_58.html

♦️ *टोमॅटो डोसा* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_7.html

♦️ *गवारीची भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_11.html

♦️ *टरबुजाचे सरबत* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_75.html

♦️ *काजूकरी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_6.html

♦️ *अंड्याचा पोळा* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_31.html

♦️ *मेथी चिकन* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_60.html

♦️ *ऑल परपज आटा-तिखट पुरी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_5.html

♦️ *अनुपमेय उपमा* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_3.html

♦️ *लेख-घरातली फ्रँकी* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_61.html

♦️ *दही मेतकुटातील मिरच्या* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_34.html

♦️ *घरचं लोणचं!* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post.html

♦️ *कर्टुले चा ठेचा* http://adheepotoba.blogspot.com/2017/08/blog-post_72.html

♦️ *उपवासाची गोड नारळी भगर* http://adheepotoba.blogspot.com/2017/08/blog-post_64.html

♦️ *मटार उसळ-कविता अन् पाककृती* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_32.html

♦️ *स्वयंपाकाची भांडी* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_3.html

♦️ *फणसाची भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_24.html

♦️ *स्वयंपाक घर-सविता करंजकर* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_19.html

♦️ *पालक पराठा* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_81.html

♦️ *पालक पराठा* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_14.html

♦️ *चकोल्या* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_51.html

♦️ *अनोखे नूडल्स* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_27.html

♦️ *लेख-सविता करंजकर* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_26.html

♦️ *शेंगाची पोळी* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post_35.html

♦️ *मसाला खाखरा* http://adheepotoba.blogspot.com/2018/02/blog-post.html

♦️ *कोबी पराठा* http://adheepotoba.blogspot.com/2018/03/blog-post_12.html

*सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
*#अन्नपूर्णा*

Wednesday, March 21, 2018

काजूची उसळ

ओल्या काजूची उसळ
♦️ उसळ म्हणाल ओल्या काजूची तर आपण मटन किंवा चिकन बनवताना जस वाटप करतो ओला नारळ, सुकं खोबरं, आलं, लसूण, कांदा हे सगळं भाजून घेऊन त्याच वाटप तयार करायचं आणि कांदा तेलात फोडणीला घालून मसाला, वाटप घालून मग वाफवलेले ओले काजू (वाफवून साल काढून टाकणे) त्यात घालावेत आणि छान एक उकळी आणावी तयार ओल्या काजूची उसळ.
सुचेता दरपे
♦️ कांदा  तेलावर लाल होई पर्यंत परतुन घ्यावा, सुख खोबर भाजून घ्यावे, हे बारीक वाटून घ्यावे, कढईत तेल गरम करून त्यात कांदा बारीक चिरलेला घालावा, हळद, तिखट घालून परतवून त्यात काजू एक बटाटा टाकून परतून पाणी घालून शिजायला ठेवणे, काजू शिजल्यावर मिठ गरम मसाला टाकणे.
वंदना मंकीकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

फोटो सौजन्य-ममता संसारे

थालीपीठ

श्रीनिवास गोखले- थालिपीठाची भाजणी साहित्य

१किलो तांदूळ,
२०० ग्रॅम प्रत्येकी हरभरे,
काळे उडीद,
गहू ,व १५० ग्रॅम धने.

कृती

हे सर्व खमंग भाजावे.व दळून आणावे.
वर सांगितल्याप्रमाणे भाजणी करून घेतल्यावर,२ वाटी भाजणी,१ मोठा कांदा बारीक चिरून किंवा किसून घेणे,योग्य तेव्हडे मीठ,तिखट,मध्यम पळी भर शेंगतेल पाणी घालून जरा ओलसर घट्ट भिजवून गोळा करणे,पातेल्यात १ पळी तेल घालून भाजणीचा गोळा  सारखा थापायचा व मध्य भागी बोटाने ५-६ भोकं पाडून त्यांत शेंगतेल जरा-जरा भरायचे व मंद गॅसवर पातेले ठेऊन झाकण ठेवावे,वाफेबरोबर भाजणीचा वास आल्यावर ताटात पाडून झाऱ्याने आख्खे(दुसरी बाजू) उचलून पुन्हा पातेल्यात ठेऊन मंद गॅसवर ठेऊन करपण्याअगोदार अंदाजाने उतरवावे,झाले की नाही खमंग थालीपीठ !

टीप-त्यावर साईचं दही,लोणी/ साजूक तूप घरी कढवलेलं असेल तर उत्तम + फोडणीची मिरची/लसणीच तिखट

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

मसाले भात-लेख

मसाले भात-लेख

गुढीपाडव्यादिवशी केलेला मसालेभात उरलेला...बराच होता...रात्री फ्रीजमध्ये ठेवावा असा विचार होता...पण फ्रीजमधलं अन्न खाण्याला आमच्या घरात तीव्र विरोध..

कंटाळा आलेला...तरीही दुपारी आवरल्यावर लगेचच तो भात पुन्हा एकदा पुरतं तेल जिरं-मोहरी घालून  थोडं सढळ हस्ते तिखटमीठ घातली ,भरपूर कोथिंबीर चिरून घातली.ओल्या
हाताने चांगले मळून घेतले..

एका ताटाला तेल लावले आणि त्या ताटात भाताचे नाजूक आकारातले सांडगे घातले आणि ताट दिलं ठेवून कडक उन्हात..

अर्थातच ताटावर तलम ओढणी टाकली धूळ बसू नये म्हणून...

त्यादिवशी चार तास उन लागलं आणि दुसऱ्या दिवशी थोडंफार...
संध्याकाळी चटकमटक खायच्या वेळी खडखडीत वाळलेले मसाले भाताचे सांडगे तळले...

झाला की चट्टामट्टा !!

आता लवकरच मसालेभात करून उरवायची ऑर्डर आलीय...

फक्त एक चूक झाली...

गडबडीत फोटो काढायला विसरले..

असो..लवकरच फोटो ही पाठवेन.
पण त्याआधी तुम्ही करून पहायला विसरू नका.
धन्यवाद

सविता करंजकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

मिश्र चटणी

मिश्र चटणी
साहित्य
1)..लसूण+डाळं +शेंगदाणे [ एक वाटी ]
2)..खुरासणी(कारळं),तीळ,[अर्धी वाटी ],3 लवंगा
3)..मीठ,तिखट,साखर व एक मोठे आमसूल..कढीपत्त्याची वाळलेली पाने,(खूप वेळा उरतात,ती वापरायची,)
कृती
लसूण+डाळं +शेंगदाणे [ एक वाटी ]
खुरासणी(कारळं),तीळ,लवंग..
हे सर्व भाजून घेणे व मिक्सरवर फिरवणे,एक भांड्यात ,काढून घेणे
नंतर, *त्यातली थोडी चटणी ,तिखट+मीठ+आमसूल* हे मिश्रण मिक्सरवर फिरवून घेणे,
सर्व एकत्र करून,हातांनी एकजीव करणे..
थोडं,थोडं करून परत मिक्सर वर फिरवणे...
लोखंडाची कढई चांगली गरम करून,गॅस बंद करून,सर्व मिश्रण कढईत टाकून चमच्याने फिरत राहणे,
गार झाल्यावर,डब्यात भरणे...
वृषाली गोखले
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

सोडे भात

सोडे भात
साहित्य:-
सोडे , सुरती कोलम तांदूळ( घरात जो तांदूळ असेल तो घेणे), आलं-लसूण पेस्ट, कांदे बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत, दालचिनी छोटा तुकडा, 3/4 काळीमिरी,  3/4 लवंगा, तांबडे तिखट,  चिकन मसाला,  चवीनुसार मीठ,  तेल.
कृती:-
प्रथम तांदूळ धुवून अर्धा तास आधी ठेवणे. सोडे धुवून पाण्यात अर्धा तास भिजत घालावेत.
        गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल घालून गरम करत ठेवावे त्यात दालचिनी, काळीमिरी, लवंगा घालाव्या नंतर कांदे टाकून परतावे मग टोमॅटो घालावे परत परतावे त्यात  आलंलसूण पेस्ट घालावी तांबडे तिखट चिकन मसाला घालून परतावे मग त्यात सोडे घालून छान परतावे मग तांदूळ घालावे त्यात जेवढे तांदूळ त्याच्या तिप्पट गरम पाणी घालून मीठ घालून ढवळावे..मग झाकण ठेवावे... पंधरा मिनिटातच सोडे भात खाण्यास तय्यार...
मंजिरी होनकळसे.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

थालीपीठ आणि गाणं

थालिपीठ भाजणी
              
अर्धा किलो ज्वारी बाजरी,         
पाव किलो हरबरा डाळ ,
उडीद डाळ
गहू
तांदूळ,
जाड पोहे,                       
अर्धी वाटी हरभरे
नाचणी    
पाव वाटी धने, जिरे           

सर्व धान्ये खमंग भाजून घेऊन मग एकत्र दळावीत खमंग भाजणी तयार!!

अर्चना

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

थालपीठाच्या भाजणीचं गाणं असू शकतं का?
तर असू शकतं!!! ज्ञानभाषामराठीच्या खास पाककृतींच्या 'अन्नपूर्णा' गटावर भाजणीच्या पिठावर चर्चा चालू असताना आलेली mp3 फाईल देत आहे..

ऐका आणि इतरांना ऐकवा :-
https://drive.google.com/file/d/11v5CnHXwq7PNXp6L_eXnkeRy0HQIXSY3/view?usp=drivesdk

थालीपीठ भाजणी:
४ भाग बाजरी
प्रत्येकी २ भाग:
मूग डाळ, चणा डाळ, तूर डाळ, उडीद डाळ
प्रत्येकी एक भाग
धणे, तांदूळ, ज्वारी, गहू, नाचणी, मटकी
प्रत्येकी अर्धा भाग
मेथ्या, जिरे

सर्व धान्ये खमंग भाजून घ्यावी. आणि भाजणी दळावी

संकलन:-दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठी
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

बडीशोप सरबत

बडीशोप सरबत
साहित्य:
१०० ग्राम बडीशोप
२ टेबलस्पून गुलकंद
१ किलो साखर
५ काळीमिरी
५ लवंग
१ छोटा तुकडा दालचिनी
कृती
प्रथम साखर घेऊन, त्यात साखर बुडेल एवढेच पाणी घालून एकतारी पाक करून थंड करून घ्यावा. नंतर मिक्सरमध्ये बडीशोप बारीक करून घ्यावी . नंतर त्यात बाकी सर्व उरलेले साहित्य घालून एकत्र वाटून घ्यावे. त्यात थोडे पाक घालून त्याची पेस्ट बनवावी. आणि नंतर ते वाटलेले मिश्रण पाकात घालून एकत्र करून घेऊन गाळून भरून ठेवावे. आणि सरबत बनवतांना 1:3 प्रमाणे बनवावे. पाणी खूप थंड हवे. सरबत बनवून फ्रिजमध्ये ठेवलं तर उत्तम.
अभिलाषा अमोल शिंपी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा


Tuesday, March 20, 2018

चर्चा-आजची भाजी- नवलकोल

चर्चा-आजची भाजी- नवलकोल

♦️सुचिकांत-उद्या *नवलकोल* ही भाजी घेऊ या ... आज सर्व सदस्य पाककृती आठवून ठेवा.

♦️अंजली जोशी-पंजाबी पद्धतीची नवलकोलाची भाजी

एकदम सोपी आणि छान..
हिरव्या हिरव्या पानांचे कोवळे नवलकोल .स्वच्छ धुवून घ्या.पाने बारीक चिरून घ्या नवलकोल सारे काढून बारीक चिरून घ्या.अथवा
पानं आणि सालं काढलेले नवलकोल तुकडे एकत्र food processor मधून काढा
Pressure pan मध्ये फोडणी साठी तेल गरम करून घ्या.तेल तापले की त्यात थोडी मोहरी , आणि खूप हिंग, मिरच्या घालाव्यात.त्यात बारीक चिरलेला नवलकोल आणि पाला घालावा.मीठ आणि पाणी घालावे.
दोन तीन शिट्ट्या झालेल्या की भाजी तयार.
कुठल्याही मसाल्या ची, आले लसूण धने जिरे गरज नाही फक्त
हिंग.. भरपुर
मीठ मिरची
सुंदर भाजी होते
नक्की try करा😄🙏🏻

♦️अर्चना :-नारळासारखा खव़ून घ्यायचा मीठ दाण्याचे कूट लिंबू पिळायचे नारळ कोथिंबीर थोडेसे, वरूनमिरची कढीपत्ता जिरे मोहरी घालून खमंग फोडणी तेलाची!

♦️दीपाली प्रसाद:-नवलकोल किसून घेणे, तेलावर फोडणीला जीरे-मोहरी, हलद, हिंग, मिरची, कढिपत्ता घालून अर्धी वाटी भिजवलेली मूग डाल घालून एक वाफ घेणे, त्यावर किसलेलि नवलकोल, मीठ घालून चांगला शिजवून घेणे.

♦️वृषाली गोखले:-नवलकोल ची साले मात्र नीट काढावी लागतात,नाहीतर तंतू राहिले तर,खाताना
मजाच जाते,
आणला की तो फ्रीझ मध्ये अगदी फार फार तर एक दिवस च ठेवायचा..
नवलकोल ची साले पाण्यात उकळून त्या पाण्याचा वाफारा घेतला तर,घशातील कफाचा चिकटा जातो,त्याच पाण्याने गुळण्याही करायच्या

♦️ज्योती खांबेटे: नवलकोल बारीक चिरून हरभराडाल घालून देखील भाजी करता येते

♦️शर्मिष्ठा-नवलकोल बारीक चिरून घ्यायचा आलं-लसूण पेस्ट गरम मसाला सर्व तेलावर घालून फोडणी करायची मग भिजवून ठेवलेले सोडे घालायचे मिठ तिखट चवीप्रमाणे. थोडा नारळाचा चव घालायचा व मग छान रटरटू द्यायची भाजी. सोडे घालून नवलकोलाची भाजी मस्त लागते.

♦️वंदना मंकीकर:- सोडे घातले कि त्या मधे कोकम घालाव

♦️शर्मिष्ठा:- हो. आंबट गोड छान चव येते.

♦️अस्मिता भस्मे: फिंगरचिप्ससाठी बटाट्याचे काप करतो त्याप्रमाणे नवलकोलच्या फोडी करुन घ्याव्यात. कांदा उभा    चिरून घ्यावा.फोडणीमधे मोहरी जीरं हिंग हळद कढीपत्ता टाकावा.कांदा घालून थोडेसे परतावे. नवलकोलच्या फोडी घालाव्यात. तिखट मीठ घालून थोडेसे परतावे. छान कुरकुरीत लागते भाजी. कुरकुरीत नको असेल तर वरती झाकण ठेवून चांगली वाफ आणावी.

♦️रश्मी गांधी:-नवलकोल कोवळा आहे की नाही हे कसे ओळखायचं

♦️वृषाली गोखले-सालावरून कळते

♦️ज्योती खांबेटे: नखांनी  दाबून बघायचे नवलकोल कोवला आहे की नाही शक्यतो छोटे छोटे घ्यावे

♦️अंजली जोशी:- Chennai कडे कढीपत्ता, मिरची आणि ओलं खोबरं यांच्या वाटणाची सुखी भाजी करतात.हळद न घालता.
गाजर आणि नवलकोल किसुन दही घालून कोशिंबीर करतात.परदेशात salads मध्ये वापरतात.

♦️अस्मिता भस्मे: नवलकोल शिजवून कांदा टोमॉटो घालून बटाट्यासारखी रस्सा भाजी पण छान होते. यात थोडी दालचीनी ठेचून घालायची.

♦️अंजली जोशी: त्यात बटाटे पण घालतात.

♦️अस्मिता भस्मे: आवडीनुसार

♦️वृषाली गोखले:- नवलकोलची पाने ( पिवळी झालेली नकोत)
पातीचा कांदा व कांदा पात.. यांची सुखी भाजी मुगाचे पीठ पेरून!

साहित्य

बारीक चिरलेला पातीचा कांदा,नवलकोल ची पाने व पात,लालतिखट व हळद,हिंग,मीठ,
मुगडाळीचे पीठ,जिरे,आवडत असेल तर थोडी पिठी साखर,मोठ्या बुडाची कढई,

कृती

कढईत फोडणीत तेल नेहमीपेक्षा जास्त घालणे,जिरे तडतडल्यावर हळद,हिंग घालून,बारीक चिरलेले सर्व साहित्य घालणे व 5,7 मिनिटे उलथण्याने परतून,झाकण दाबून ठेवणे(5 मिनटं )..वाफेवर सर्व साहित्य मिळून येईल.
मग लाल तिखट,मीठ व मूग पीठ पेरून,(आवडत असेल तर आत्ताच थोडी पिठी साखर घालणे )
परत चांगले 5,7 मिनटं
परतणे,सर्व एकजीव झालेले दिसेल,गॅस बंद करून,झाकण दाबून ठेवणे व 15,20 मिनटं वाफ मुरू द्यावी..
सुरुवातीलाच तेल जास्त टाकलेले आहे,त्यामुळे
पीठ पेरताना खूप नाही घालायचे नाहींतर कोरडी होईल भाजी,ताज्या पोळीबरोबर
(थोडे साजूक तूप गोडेतेला ऐवजी लावणे ) खायला मजा येते
भाजी किंचित तिखटच
करावी!या दिवशी जेवणात,साधे वरण,भात, लिंबू/आंबा लोणचे घ्यावे,उडदाचा पापड व दही/ताक हेही असावे!

♦️वृषाली गोखले:- नवलकोल च्या फोडी,टोमॅटो व सिमला मिरची..मिक्स भाजी!

साहित्य
बारीक चिरलेल्या नवलकोल च्या फोडी(तंतूंच्या गाठी नकोत ),
बारीक चिरलेला टोमॅटो,सिमला मिरचीचे जरासे मोठे तुकडे,काळी मोहरी,
तमालपत्र छोटी 2,3/दालचिनी 1/लवंग 1
हळद/हिंग /लालतिखट /मीठ/गुळ (फक्त चवीपुरता),सुक्या खोबऱ्याचा किस/ओल्या नारळाचा किस(either/or ),कढई किंवा खोलगट भांडे..

कृती

फोडणीत लालमोहरी तडतडल्यावर,तमालपत्र दालचिनी,लवंग घालून,मोठ्या चमच्याने हलवून, चिरलेले साहित्य घालणे.वरती झाकण म्हणून थाळा घेऊन,त्यात दोन वाट्या पाणी घालणे..जरा  लक्ष ठेवून अंदाजाने 5,7 मिनिटानंतर फोड शिजल्याची खात्री झाली की,
लालतिखट/किस/गुळ(चवीपुरता,टोमॅटोचा आंबटपणा जाईल इतपत),घालून गॅस बंद!

सहभागी सदस्यांचे आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

Thursday, March 15, 2018

दहिवडी


मुगडाळीचे दहिवडे:

2 वाट्या मुगडाळ, अर्धी वाटी उडीद डाळ 2 तास वेगवेगळ्या भिजत घालाव्यात.
उपसून थोडी हळद, काळे मिरे, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर, थोडे खवलेले नारळ (ऐच्छिक) घालून वाटून घ्यावे. इडलिपीठापेक्षा थोडे घट्ट रवण असावे.

एकबाजूला  अर्धे दही लोणून त्याचे घट्टसर ताक करून घ्या. त्यात साखर, मीठ, हिरवी मिरची +आलं+जिरं  वाटून, कोथिंबीर आणि सैंधव मीठ घालून ढवळून ठेवा.

आता, तेल तापवत ठेवा. गरम झाल्यावर थोडे मोहन  आपल्या रवणात सोडा. ढवळून छोटे छोटे (आठवा लग्नांमध्ये मिळणारे मिनी बटाटे वडे) वडे तेलात तळायला सोडा.

वडे बाहेर काढले की पाण्यात न टाकता ह्या ताकात सोडा.

आयत्या वेळी उरलेले अर्धे दही फेटून त्यात चवीनुसार साखर मीठ घालून वडे सोडलेल्या मिश्रणात ओता.

खजूर, चिंच, जिरं आणि मीठ घातलेली चटणी आणि पुदिना, मिरची, आलं, कोथिंबीर , मीठ अश्या दोन चटण्या वरून वाढण्यासाठी ठेवा.

तळटीप: उगाच वडे तळायला कंटाळला असाल तर सरळ वाण्याकडे जा, छानसे बटर(चाहसोबत खाण्यासाठी जो गोल गोल बेकरी पदार्थ मिळतो तोच)  विकत आणा, आणि खाण्यापूर्वी 15 मिनिटे तयार दह्यात सोडा, दहिवड्याचा विषय मोडा.☺️

© दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

गुढीची माळ

गुढीची माळ
गुढीची माळ घरीच बनवा. सोप आहे.
साखर भिजेल इतक पाणी घालून पक्का पाक करा. त्यात चिमूटभर सोडा घाला.एका ताटाला पुसटसा तुपाचा हात लावून त्यात दोरा पसरून ठेवा. त्यावर चमच्याने पाक घाला. पाच मिनिटात कोरड होउन माळ सुटून येईल. या वर्षी करून बघा.
वैशाली क्षीरसागर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा






सिंधी कढी

सिंधी कढी

साहित्य :

तेल 2 ते 3 चमचे
बेसन पीठ 3 चमचे
तिखट 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
हळद पाव चमचा
कोकम 4 किंवा 5
हिंग
मोहरी
मीठ
फ्लॉवर
भेंडी
अरवी
बटाटा
मटार
कोथिंबीर

कृती :

प्रथम कढईत तेल घालून चांगले गरम होऊ द्यावे नंतर त्यात बेसन घालून चांगले भाजावे खमंग वास येई पर्यंत नंतर त्यात तिखट, हळद, गरम मसाला घालून चांगले परतून घेऊन त्यात पाणी घालावे. ते पाण्याला उकळी आली की त्यात भेंडी सोडून सर्व भाज्या घालाव्यात आणि कोकम आणि मीठ पण घालून द्यावे. भाज्या थोड्या शिजत आल्या की त्यात भेंडी घालावी व सर्व भाज्या पूर्ण शिजल्या की गॅस बंद करावा आणि त्यावर तडका द्यावा.

तडका:
तेल गरम करून त्यात मोहरी घालून  चांगली तडतडली की हिंग  घालावा आणि कोथिंबीर पण घालावी आणि हा तडका त्यावर घालून झाकुन ठेवावे . सिंधी कढी तयार ही कढी भातासोबत आणि फुलक्यान सोबत छान लागते.

अभिलाषा अमोल शिंपी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

केळीच्या पाककृती

ममता संसारे- भरलेली केळी
केळी उभी काप देऊन घ्यायची
ओल खोबर साखर वेलची पावडर एकत्र करुन वांगी भरतो तशी भरून घेणे
पैन मध्ये तूप घालून त्यावर केळी व्यवस्थित लाऊन घेणे मंद गैस वर ठेवणे झाकन ठेवणे
2 ते 3 मिनिटात परतवने थोड़ी लालसर झाली की गैस बंद करणे

वंदना मंकीकर- केळ्यांचा हलवा
पिकलेली केळी बारीक चिरून घ्यावीत.
कढईत तुप गरम करावे, त्यामध्ये केळी टाकून परतवावीत.
ओल खोबरं आणि साखर घालून साखर एकजीव होईपर्यंत परतून घ्यावी. वेलचीपूड घालणे. अर्ध लिंबू पिळाव
छान लागतो.

वसुधा करमरकर-केळ्याची कोशिंबीर
केळ्याची कोशिंबीर सुद्धा करतात.मोहरी पावडर फेसून घालतात.व मिरची ,ओला नारळ,दही मीठ ,आवडत असल्यास कोथिंबीर.

दीप्ती पुजारी : पिकलेल्या केळ्यांचे बन्स
उडुपी नाश्ता
एक अगदी पिकलेले केळे.  अगदी मऊ झालेलेही चालेल.
पाव कप दही.
2 कप कणिक
4-5 काळी मिरी पूड करून
2 चमचे जिरेपूड
पाव वाटी पिठीसाखर.
चवीनुसार मीठ
थोडे गरम तेलाचे मोहन
केळे चुरून त्यात मीरपूड, साखर, मीठ, जिरेपूड, दही एकजीव करून घ्यावे. कणिक मिसळून घ्यावी. त्यात गरम तेलाचे मोहन (3-4 चमचे) घालावे.
गरजेनुसार पाणी घालून पुऱ्यांना मळतो तसे घट्ट पीठ मळावे.
3-4 तास बाजूला झाकून ठेवून द्यावे.
रात्री भिजवून सकाळी बन्स करायचे असतील तर कणिक मळून शीतकपाटात घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून द्यावी.
तेल तापवून छान पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात.
पुऱ्या बाहेरून टम्म फुगतात आणि आतून त्यांना पावासारखी छान जाळी पडते.
चहासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत मस्त लागतात.



♦️जयश्री:- कच्च्या केळ्याची भाजी♦️
साहित्य-
कच्ची केळी,आलं लसूण वाटण,सुकल्या लाल मिरच्यांची भरड,काळे-पांढरे तीळ, कोथिंबीर, लिंबू रस,मीठ,हळद न तांदळाचे पीठ.
कृती-
कच्च्या केळ्याचे काप करून घ्यावेत. त्यांना तांदळाचे पीठ सोडून बाकी सर्व साहित्य मस्त चोळून१० ते १५ मिनिटे म्यारीनेट करत ठेवावे.
तांदळाच्या पिठात थोडं मीठ टाकून त्यामध्ये काप घोळवून pan मधे shallow fry करून घ्यावेत.
कुरकुरीत होतात मस्त..!!



♦️अस्मिता भस्मे: कच्चा केळीची सुक्की आणि रबरबीत.♦️
सुक्की भाजी:
      केळ्याच्या एकदम छोट्या छोट्या चौकोन फोडी करायच्या. फोडणीसाठी तेल गरम करायचे.त्यात जीरं मोहरी हिंग कढीपत्ता टाकायचा. नंतर बारीक चिरलेला कांदाफोडणीत परतून घ्यायचा.चिरललेली केळी टाकून थोडे परतायचे. सुक्या लाल मिरच्या आणि ओल्या खोबर्याचे ओबडधोबड वाटण घालून मीठ घालून चांगली वाफ आणायची. वरून कोथिंबीर पेरायची.

सुक्या केळीची रबरबीत भाजी:
            केळीच्या मोर्या फोडी करायच्या. फोडणीत कांदा लालसर परतावा.ईथे फोडणीत हळद पण टाकावी.बारीक चिरलेला टोमॉटो  घालून परतावे. रसरशीतपणा येईल इतपत पाणी घालावे. लालतिखट गरम मसाला मीठ घालून चांगली  उकळी आणावी.वरून कोथिंबीर पेरावी.

♦️दीपाली प्रसाद:कच्च्या केळीची उपवासाची भाजी♦️
साजूक तुपावर जीरे मिरची मीठ ठेचा किंवा अख्खे घालून त्यावर केलीचे काप घालून दणदणीत वाफ आणणे.
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

फणसाची भाजी

फणसाची भाजी
कच्चे फणसाचे गरे पण जून हवेत
सुखी मिरची, हींग,हळद, मीठ, धने
ओल खोबर,कोथिम्बीर, जिर, मोहरी
कृती
गरे बेताचे चिरून घेणे आतिल बिया फोडून घ्याव्या कढाईत पाणी घेऊन त्यात आधी बिया शिज उन घ्याव्या थोड्या शिजायला कमी ठेऊन त्यात गरे घालावेत गरे बोट चेपे शिजवावेत त्यात आधीच हळद व मीठ घालावे
गरे शिजले की सगळे पाणी काढून टाकावे
दुसऱ्या कढाई त तेल घालून त्यात सुखी मिरची खड़ा हींग धने भाजुन घ्यावे
व मिरची हींग धने सरसरित वाटून घ्यावे वफनासाच्या गरयांना लाऊन घेणे वरुन थोड़ा हींग जिर मोहरीची फोडणी द्यावी वरुन खोबर कोथिम्बीर घालावी
ममता संसारे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा


खरवस

खरवस
अर्धा लिटर कच्चा खरवस
पाव लिटर दुध
१ वाटी साखर
१ चहाचा चमचा वेलची पावडर
१ चहाचा चमचा दुध मसाला
चिमुटभर केशर
कृती - सर्व जिन्नस एकत्र करुन चमच्याने ढवलून एकजीव करावे. कुकरच्या भांड्यात घेऊन चागंल्या ४-५ शिट्या घ्याव्यात. गार झाल्यावर वड्या पाडून आस्वाद घ्यावा.
दीपाली बोधे, पुणे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा


कोथिंबीर तिखट आणि पोहे

कोथिंबीर तिखट आणि पोहे

साहित्य -

कोथिंबीरीची एक जुडी, सुक्या खोब‍ऱ्याची एक वाटी, लाल तिखट, थोडं ज‌िरं, मीठ.

कृती -

ज‌िरं थोडंसं भाजून त्याची पावडर करून घ्यावी. खोबरं किसून भाजून घ्यावं. कोथिंबीर निवडून आणि धुऊन घ्यावी. बारीक चिरुन ठेवावी.

भाजलेलं खोबरं मिक्सरमधून बारीक करुन घ्यावं. त्यात ज‌िरे पावडर मिसळावी. ते वेगळं काढून घ्यावं. मग चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार लाल तिखट, मीठ घालून मिक्सरमधे वाटून घ्यावं. त्यात वाटलेलं खोबरे, ज‌िरे पावडर मिसळावी. पुन्हा एकदा चांगलं वाटून एकजीव करावं.हे झालं कोथिंबीरीचे तिखट तयार! हे तिखट उपासालाही चालतं. त्यात दही घालून किंवा नुसतंही आपण ते खाऊ शकतो. पोळी किंवा भाकरीबरोबरही ते छान लागतं.
कोथिंबीर ओली असते, त्यामुळे हे तिखट लगेच डब्यात भरु नये. तिखट तयार झालं की दोन-तीन तास ताटात पसरुन ठेवावं. थोडंसं वाळल्यानंतर डब्यात भरावं.

आता पोह्यांची तयारी करू.

थोडेसे जाडे पोहे भाजून त्यात कच्चे गोडेतेल, तयार केलेलं कोथिंबीरीचे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून कालवा. मस्तपैकी इन्स्टंट नाश्ता तयार होईल.

सविता करंजकर.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

Tuesday, March 13, 2018

कारल्याची सोप्पी भाजी

कारल्याची सगळ्यात सोप्पी भाजी

साहित्य:

कारले
चिंच
गूळ
तिळाची पूड किंवा
शेंगदाणे पूड
जिरे धणे पावडर
तिखट/हिरवी मिर्ची
हळद
मीठ

कृती:

फार कडवट चव आवडत नसल्यास कारले गोल चकत्या चिरून त्याला किंचित हळद आणि मीठ टाकून अर्धतास ठरवून देणे.

त्याला पाणी सुटले की घट्ट पिळून घेऊन मोकळे करून ठेवणे.

कडवट चव आवडत असेल तर फक्त कारले गोल चकत्या करून बिया काढून घेणे.

पाव किलो कारली असतील तर साधारण मोठ्या लिंबाच्या एकदा गूळ खडा आणि साधरण तेवढ्याच आकाराचा चिंचेचा गोळा घेणे आणि एकत्र भिजवून ठेवणे.

१० मिनिटांनी  चिंच गुळाचा एकत्र कोळ काढून घेणे

जड बुडाच्या भांड्यात मोहरी जिऱ्याची हिंग टाकून फोडणी करून त्यात कारली परतून घेणे.

खरपूस परतून झाली कारली की त्यात तिखट मीठ हळद टाकून एक हात परतून त्यात चिंचगुळाचा कोळ, तिळाचा कूट, जीरेधने पावडर टाकून मस्त तेल सुटे पर्यंत अगदी मंद आचेवर शिजवून घेणे..
भाजी तयार आहे, आवडत असेल तर कोथिंबीर वरून वापरा.

भार्गवी दीक्षित

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

कारले.. परतलेली भाजी

साहित्य

लांबट कारली,पाव किलो, भरपूर कडीपत्ता,गुळ, आमसूल ५० ग्रॅम,

जिरे,ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी,
मीठ,थोडे तिखट ( पाव किलोला 2 चमचे)

कृती

कारल्या ला खूप काटे असतील तर काढणे,
पातळ चकत्या करून,मिठाच्या गरम पाण्यात धुणे,दोन्ही हातानी,१-२ वेळा सगळ्या चकत्या चोळणे,फक्त अतिरिक्त कडूपणा जाईल, इतपतच!
बिया आठवणीने काढणे

मोठ्या कढईत, तेल व जिरे टाकणे(हिंग नाही )
कडीपत्ता टाकणे, चकत्या टाकणे आणि २ ते ३ मिनटं गॅस मोठा ठेवून,खरपुस परतणे
तेल नेहमीपेक्षा जास्त
गॅस बारीक करून अमसुल,खोबरे टाकून झाकण दाबून ठेवणे,साधारण एक मिनिटाने झाकण काढून,गूळ (आवडत असेल तरच ) टाकणे,थोडे
परतुन घेऊन,गॅस बंद व झाकण दाबून ठेवणे
फुलक्या बरोबर खाणे

वृषाली गोखले

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा