Friday, March 9, 2018

हिरव्या मुगाचे डोसे- एडण्या

हिरव्या मुगाचे डोसे- एडण्या

ह्या दोन प्रकारे करता येतात.
१ हिरवे मूग दळून त्यांचं पीठ करायचं
2. हिरवे मूग मोडावून त्यांना वाटून घ्यायचं

मुगाचे पीठ/ मोडवल्या मुगाचे रवण घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण(मला एडण्यांमध्ये भरपूर लसूण आवडतो.) जिरं यांचं वाटण घालायचं. आवडत असल्यास कांदा बारीक कापून घालायचा.
डोसे लावता येतील इतपत पातळ मिश्रण करायचं.
तवा तापवून, तेल सोडून नेहमीप्रमाणे घावन लावायचं, भाजयचं आणि खायचं

दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment