मेथी चिकन
साहित्य
१ किलो. चिकन,
कसूरी मेथी 2 वाटी,
४कांदे बारीक चिरलेले,
आल मिरची लसूण पेस्ट आपल्या आवडी प्रमाणे ,
तिखट ४चमचे,
किचन किंग मसाला २ ते ३ चमचे,
हळद 1/2 चमचा, मीठ चवीनुसार,
५ काळीमीरी,
६लवंगा,
४तमाल पत्र,
तेल अर्धी वाटी .
कृती:-
सर्व प्रथम चिकनला हळद तिखट , आल लसूण पेस्ट किचन , किंग मसाला मिठ लाऊन १ तास ठेवाव. कढई तापल्यावर त्यामध्ये तेल टाकाव त्यामध्ये काळीमिरी लवंग तमालपत्र तेलात टाकाव त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यामधे कसूरी मेथी टाकून परतून घ्यावे . नंतर त्यामधे चिकन टाकून परतत रहावे. गॅस मोठा ठेऊन चांगले परतावे. गॅस बारीक करून कढईवर झाकण ठेवाव झाकणावर पाणी ठेवाव व शिजू द्यावे . शिचल्यावर पाणी सुटल्यास परतून पाणी आटवाव. भाकरी बरोबर मस्त लागते .
हि माझी खासियत आहे, आमच्याकडे सर्वाना आवडते
वंदना मंकीकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment