Friday, March 9, 2018

पोहे-प्रकार

दडपे पोहे

अर्धा किलो पोहे ,कांदे 2 मोठे ,2 नारळ. टोमँटो 2, कोथिंबीर वाटीभर, शेंगदाणे अर्धी वाटी ,लिंबू एक ,मिरची 4. व फोडणीला तेल वाटीभर,मोहरी .हिंग हळद तिखट, मीठ,साखर थोडी ,नारळ फोडून पाणी. पोह्यावर घालायला ठेवून खवणे,कांदा,टोमँटो कोथिंबीर मिरची बारीक चिरणे,फोडणीला तेल शेंगदाणे मिरची हिंग मोहरी हळद तिखट घालून करा पोहे कांदे टोमँटो नारळ कोथिंबीर साखर मीठ एकत्र कालवा व फोडणी ओता परत कालवा नारळपाणी घाला कालवा व पातेल्यानी दडपून ठेवा.

इंदोरी नाश्ता...इंदोरी पोहा

पोहे घेवुन ते स्वच्छ घुवुन १० मिनिट पाण्यात भिजवावे. एका ताटात हे पोहे काढुन त्यात हळद मीठ व पिठी साखर चोळून घ्यावी. आता एका कढइत तेल घालुन त्यात मोहरी बडीशेप हिंग मिरची तुकडे हे घालुन परतुन त्यात भिजवलेले पोहे ५ मिनिटे परतून घ्यावे.वरुन चिरलेली कोथिंबीर रतलामी शेव कांदा टाकावा व पोहा मसाला स्प्रिंकल करावा .

सुदामाचे पोहे

- पातळ पोहे पाव किलो,गुळ 150 ग्रँम थोडे साजुक तुप वेलची पावडर थोडी,गुळा चिरून, कढईत मंद गँस वर थोडे थोडे पोहे तापवून घ्या बाजूला काढुन मग.थोडे तुप,गूळ व थोडे पाणी टाकून  टाकून पाक करावा गँस बंद करून मग पोहे टाका सारखे ढवळा.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment