Saturday, March 3, 2018

दही मेतकुटातील मिरच्या

दही मेतकुटातल्या मिरच्या
जाड हिरव्या मिरच्या उभी चीर देऊन आतून मीठ लावून घ्याव्यात. (तिखट खाणारे कच्चे लिंबू असतील तर बियाही काढून घ्याव्यात)
कडची मध्ये शेंगदाणा तेल (हो शेंगदाणाच) फोडणीसाठी गरम करा.
त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरच्या घाला.
मिरच्या जरा मऊ होण्यासाठी झाकून ठेवा.
इकडे दह्यामध्ये मेतकूट आणि चवीनुसार मीठ कालवून घ्या. (इडलीच्या पिठाइतपत पातळ पेस्ट)
मिरच्या मऊ झाल्या की ही पेस्ट टाकून ढवळून आच बंद करा.
एकदम खुमासदार होतात ह्या मिरच्या. खिचडी, थालीपीठ, पराठे ह्या पदार्थांसोबत मस्त वाटतात खायला.

दीप्ती पुजारी

No comments:

Post a Comment