सिंधी कढी
साहित्य :
तेल 2 ते 3 चमचे
बेसन पीठ 3 चमचे
तिखट 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
हळद पाव चमचा
कोकम 4 किंवा 5
हिंग
मोहरी
मीठ
फ्लॉवर
भेंडी
अरवी
बटाटा
मटार
कोथिंबीर
कृती :
प्रथम कढईत तेल घालून चांगले गरम होऊ द्यावे नंतर त्यात बेसन घालून चांगले भाजावे खमंग वास येई पर्यंत नंतर त्यात तिखट, हळद, गरम मसाला घालून चांगले परतून घेऊन त्यात पाणी घालावे. ते पाण्याला उकळी आली की त्यात भेंडी सोडून सर्व भाज्या घालाव्यात आणि कोकम आणि मीठ पण घालून द्यावे. भाज्या थोड्या शिजत आल्या की त्यात भेंडी घालावी व सर्व भाज्या पूर्ण शिजल्या की गॅस बंद करावा आणि त्यावर तडका द्यावा.
तडका:
तेल गरम करून त्यात मोहरी घालून चांगली तडतडली की हिंग घालावा आणि कोथिंबीर पण घालावी आणि हा तडका त्यावर घालून झाकुन ठेवावे . सिंधी कढी तयार ही कढी भातासोबत आणि फुलक्यान सोबत छान लागते.
अभिलाषा अमोल शिंपी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment