कटाची आमटी किंवा सार
साहित्य :
पुरण शिजवताना डाळीतल काढुन टाकलेल पाणी ,
वाटण, फोडणी पुरत तेल ,मसाले .
वाटण, फोडणी पुरत तेल ,मसाले .
वाटण :
१ मोठा कांदा ,अर्ध वाटी ओल खोबर (चकत्या किंवा किसलेल ) , तितकच सुक खोबर , लसुन ७/८पाकळ्या , १/२ ईंच आल , काळी मिरे ४ , दालचीनीचा तुकडा १ , चक्रीफुल १/२ किंवा मग जर तयार गरम मसाला असेल तर सोप काम. यात कोकणातला , विदर्भातला , खांन्देशी असे प्रकार आहेत .पाणी
वाटण कृती
वाटणासाठी तेला कांदा लाल होईस्तोवर भाजा , तो काढुन ताटात थंड होउद्या .नंतर त्याच भांड्यात दोन्ही खोबर लालसर भाजुन घ्या ते कांद्यावर पसरवुन घ्या नंतर त्यात गरम मसाले थोडेसे भाजुन घाला , लसुन आल कोथींबीर कोवळ्या काड्यांसकट , वाटल्यास अर्धा टोमॅटो घ्या हे सार मिश्रण थोड वाटुन घ्या नंतर पाणी घालुन वाटा .
आमटीची कृती :
कढईत तेल तापवुन घ्या कटाला तर्री असल्यास कस मन भरत त्यामुळे जरा वाहता हात ठेवा जरसा .त्यात २ तेजपत्ते घालुन तळुन घ्यायचा त्यात वाटलेल वाटण घालुन तेल सुटे पर्यंत परतुन घ्या त्यात मग लाल तिखट रंगा साठी काश्मिरी तिखट घेता येत , हळद असे मसाले घालुन ते ही थोडे परता .यात चवीपुरत मीठ घाला अंदाज येत नसेल तर कमीच घाला नंतर ताटात घेता येत. पुरणाच पाणी थंड असेल तर ते थोड उकळी येऊ देऊन त्यात घाला . ( तयार कढईतल्या गरम वाटणात थंड पाणी ओतु नका कारण त्याने तर्रीचा रंग व चव जाईल . शक्यतो सगळ्याच वाटणाच्या रश्यांना हा नियम लागु होतो. )यानंतर त्याला चांगली उकळी येऊद्या मात्र मंद आचेवर जेणे करुन रंग येयील . मसल्यांचा वास घरभर पसरेल . झाकण घालु नका उतु जाईल नाहीतर तर्री झाकणाला चिटकुन निघुन जाईल
महत्वाच म्हणजे काही ठिकाणी यात चिंच- गुळ घालतात किंवा मग सांडगे कुटुन , किंवा मुठीया चे ४/२ तुकडे घालतात त्याने चव अप्रतीम येते.
- सागर महाजन
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाष्य
#अन्नपूर्णा
#माझीशाळामाझीभाष्य
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment