लाल भोपळ्याची भाजी
(तिखट घालून )
साहित्य
लाल भोपळा,अर्धा किलो
ताजा कडीपत्ता,
तमालपत्र
धने जिरे पूड
तिखट (अल्प )
सुक्या खोबऱ्याची भाजून केलेली पूड
8,9 मेथीचे दाणे
बारीक चिरलेली ,ताजी कोथिंबीर,
कृती
भोपळ्याची साल हलकेच किसणे,
(त्याची चटणी करायची आहे)
भोपळ्याच्या फोडी धुऊन,फोडणीला टाकणे,तेल खूपच थोडे,फोडणीत काळी बारीक मोहरी,जिरे,मेथी,कडीपत्ता,तमालपत्र,खोबऱ्याची पूड ,
मीठ टाकणे,चमच्याने हलवणे,5 च मी झाकण ठेवून वाफ देणे,नंतर झाकण काढून,धने जिरे पूड व थोडे पाणी, रस सुटण्याइतके घालून,चमच्याने ढवळणे,कोथिंबीर वरून पसरणे.
गरम ,ज्वारीच्या भाकरी बरोबर खाणे,(साजूक तुपाबरोबर)
(ज्यांना लिव्हर चा त्रास होतोय किंवा लिव्हर संबंधी काही समस्या आहे,त्यांनी मेथीचे दाणे वर्ज्य करायचे आहेत)
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
भोपळ्याच्या सालीची चटणी
भाजी करायच्या आधी,जी साल आपण किसून घेतली आहे,तो किस,लोखंडाच्या कढईत भाजून घेणे,भाजत असतानाच पांढरे तीळ,किस जेव्हढा तेव्हडेच तीळ घेणे,
कडीपत्ताही,घालणे, सर्व भाजून झाले की ,ताटलीत काढून घेणे,त्याच कढईत तेलावर लालमिरच्या टाकणे आणि लगेच भाजलेले साहित्य टाकणे व गॅस लगेच बंद करून झाकण ठेवणे,कारण मिरचीचा खाट उठतो नि खोकल्याचा त्रास होतो,
5 मिनीटांनी,अंदाजे मीठ घालून ते सर्व चटणी~साहित्य हाताने कुस्करणे,
गोड दही आवडत असल्यास घालणे...मस्त चव लागते.
ही चटणी ,पोटाचा त्रास असणाऱ्यांनी खायची नाही
वृषाली गोखले
टीप
वसुधा आनंद करमरकर
या भोपळ्याच्या भाजीत आवडत असल्यास बडीशोप अर्धवट पूड करून घातली तरी छान लागते.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment